Solapur Businessman End Life Saam Tv
महाराष्ट्र

Solapur: हात जोडून प्रार्थना, नंतर १७ व्या मजल्यावरून उडी मारली; सोलापूरमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या, VIDEO व्हायरल

Solapur Businessman End Life: सोलापूरमध्ये प्रसिद्ध व्यावसायिकाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून त्यांनी उडी मारत आत्महत्या केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक सुनील सदारंगानी यांची आत्महत्या

  • आत्महत्येपूर्वी प्रार्थना करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • ही घटना विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये घडली

  • आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये प्रसिद्ध व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या व्यावसायिकाचा आत्महत्या करतानाचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांनी आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. सोलापूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीच्या मालकाने आत्महत्या केली. सुनील सदारंगानी (६० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सोलापूर शहरातल्या विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वीचा त्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.

सुनील सदारंगानी यांचा आत्महत्या करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये १७ व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी सदरंगानी यांनी हात जोडून प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी इमारतीवरून उडी मारत आयुष्य संपवलं. गुरुवारी दुपारच्या सुमारास ते सोलापुरातील पनाश अपार्टमेंट येथे आले होते. इमारतीच्या आतील पायऱ्यावरून चालत ते थेट अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावर गेले.

भिंतीच्या कठड्यावर एक व्यक्ती हात जोडून उभा असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले त्यांनी ही माहिती अपार्टमेंटच्या सुरक्षारक्षकाला दिली. सुरक्षाराक्षकाने सुनील सदरंगानी यांना खाली आणलं. मात्र चावी वर राहिल्याचा बहाणा करून ते पुन्हा वर गेले आणि वरून त्यांनी उडी मारली. दरम्यान सुनील सदारंगानी यांनी आत्महत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 League Mumbai: फायनलमध्ये मराठाची 'रॉयल' एन्ट्री; नॉर्थ मुंबई पँथर्सचा विजयरथ रोखत अंतिम फेरीत धडक

जमीन थरथरली, लोक घाबरून घराबाहेर पळाले; शहराला बसले भूकंपाचे सौम्य धक्के

पुण्यानंतर सांगलीत गोळीबाराचा थरार; बड्या नेत्याच्या नातवाची गोळ्या झाडून हत्या

पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना कर्जमाफी? सुरूवातीला 15 हजार कोटींचाच निधी?

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीवर पक़ड घट्ट, अनावश्यक हस्तक्षेप केल्यास विचार करणार, वर्धापन दिनाला पक्षातील नेत्यांना इशारा

SCROLL FOR NEXT