Solapur Onion Market News: Saamtv
महाराष्ट्र

Solapur News: बळीराजाची थट्टा! २४ पोती कांदा विकला; ५८ हजार खर्च अन् मिळाले फक्त ५५७ रुपये

Solapur Onion Market News: सोलापूरात एका शेतकऱ्याला एका एकरातील कांदा विकून फक्त ५५७ रुपये हाती लागलेत. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर|ता. १२ मे २०२४

केंद्र सरकारने लोकसभेच्या तोंडावर कांदा निर्यातबंदी उठवून बळीराजाला मोठे गिफ्ट दिले. तब्बल चार महिन्यांनंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र कांद्यावरील निर्यातबंदी हटली तरी शेतकऱ्यांची क्रुरचेष्टा मात्र सुरूच आहे. सोलापूरात एका शेतकऱ्याला एका एकरातील कांदा विकून फक्त ५५७ रुपये हाती लागलेत. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावचे मारोती खांडेकर यांनी एका एकरात कांद्याचे पीक घेतले होते. एका एकरात त्यांनी २४ पाकीट कांदा लावला होता. कांदा लागवड, मशागतीला त्यांनी जवळपास ५८ हजार रुपये आला होता. कांदा काढणीला आल्यानंतर त्यांनी काल सोलापूर मार्केट समितीत विक्रीला नेला होता.

मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने त्यांना या २४ पोत्यांचे फक्त २८६६ रुपये एवढी पट्टी आली. त्यातूनही हमाल,तोलाई,मोटार भाडे असा २३०९ खर्च वजा केल्यानंतर हाती फक्त ५५७ रुपये उरले. त्यामुळे बळीराजाने जगायचं कसं? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी दर मिळत नसल्याने बळीराजाच्या पदरी निराशाच पडत आहे. कांद्याची निर्यातबंदी उठवली असली तरी निर्यातीसाठी प्रति टन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आकारले आहे. तर 40 टक्के निर्यात शुल्क आहे. याचाच मोठा फटका शेतकऱ्याला बसताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाणार; जानेवारीत खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

Panchag Today: आजचा दिवस बदल घडवणारा! या 4 राशींवर नशीब होणार मेहरबान

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Manikrao Kokate Arrest Update: माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रूग्णालयात, पण...

Maharashtra Politics : कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

SCROLL FOR NEXT