Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडलं पैशाचं घबाड; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई

39 Lakh Rupees Cash Seized From Mobile Shop: छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री उशिरा मोबाइल दुकानातून ३९ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. नोटा मोजण्याच्या मशिनसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar NewsYandex

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar News) रात्री उशिरा मोबाइल दुकानातून ३९ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. नोटा मोजण्याच्या मशिनसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शहरातील पैठण गेट येथील एका मोबाइलच्या दुकानात छापा टाकला. या छाप्यात ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती मिळतेय.

याप्रकरणी रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश राठोड, असलम खान इस्माइल, शेख रिझवान शेख शफिक या चौघांना अटक झाली आहे. डिलॅक्स मार्केट कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावरील एसएस अॅक्सेसरीज नावाच्या मोबाइलच्या दुकानात (Cash Seized From Mobile Shop) आरोपी काळ्या रंगाच्या बॅगमधून ३९ लाख रुपये घेऊन आले होते. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे आणि उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांचे पथक हे निवडणूक खर्च निरीक्षकांसह घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी चार आरोपी ही रोकड आणि नोटा मोजण्याच्या मशीनसह आढळून (crime news) आले. पोलिसांनी चौकशी केली असता हवालासाठी ही रक्कम असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यांनी चौघांना अटक करून रोकड जप्त केली आहे.

छत्रपती संभाजीनगर
Amazon Pay cash Load System : 2000 च्या नोटा बदलण्याचे टेन्शन? अॅमेझॉनच्या नव्या सुविधेने घरबसल्या करता येतील खात्यात पैसे जमा, वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगरमध्ये १३ मे रोजी म्हणजेच उद्या मतदान (Lok Sabha 2024) पार पडणार आहे. याअगोदर शहरात मोठी रक्कम सापडली आहे. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांचा अटक केली आहे. एका मोबाईल दुकानात ही रोख रक्कम सापडली आहे. आरोपींकडे नोटा मोजण्याचं मशीन देखील सापडलं आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

छत्रपती संभाजीनगर
Dheeraj Sahu Cash: काँग्रेस खासदारांकडून २१० कोटींची रोकड जप्त, नोटा मोजण्यासाठी लागल्या ८ मशीन; पैसे मोजताना IT अधिकारीही थकले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com