Dheeraj Sahu Cash: काँग्रेस खासदारांकडून २१० कोटींची रोकड जप्त, नोटा मोजण्यासाठी लागल्या ८ मशीन; पैसे मोजताना IT अधिकारीही थकले

Dhiraj Sahu IT Raid Case Update: झारखंडच्या काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या धाडीत २१० कोटींची रोकड जप्त केली आहे.
Dheeraj Sahu Cash
Dheeraj Sahu Cashsaam tv
Published On

Dhiraj Sahu IT Raid Case:

झारखंडच्या काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या धाडीत २१० कोटींची रोकड जप्त केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेस खासदार साहू यांच्या ओडिशा आणि झारखंड येथील संबंधित ठिकाणी धाड टाकली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

आयकर विभागाच्या संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी २१० कोटींची जप्त केली आहे.

बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या संबंधित ओडिशा, झारखंड आणि कोलकाता येथील ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली. आयकर विभागाकडून अद्याप नोटा मोजण्याचं काम सुरु आहे.

Dheeraj Sahu Cash
Assam News: आसाम म्यानमारचा भाग होता, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात दावा

बुधवारपासून सुरु आहे छापेमारी

आयकर विभागाकडून बुधवारी छापेमारी केली. आयकर विभागाने कोटी रुपये मोजण्यासाठी नोटा मोजण्याच्या मशिनचाही वापर केला आहे. बौद्ध डिस्टिलरी ही राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कुटुंबाची कंपनी आहे.

धीरज साहू यांच्या कुटुंबाचा मद्याचाही व्यवसाय असल्याचा समोर आला आहे. ओडिशातही त्यांच्या मद्य तयार करण्याचा कारखाना आहे. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने हा व्यवसाय सुरु होता.

भाजपची काँग्रेस पक्षावर टीका

आयकर विभागाने झारखंडच्या रांची आणि लोहरदग स्थित भागात छापेमारी केली. या छापेमारीचे अनेक फोटो समोर आले आहेत. आयकर विभागाकडून ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचे बंडल जप्त केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dheeraj Sahu Cash
Uttar Pradesh News: लग्न घरातील आनंदी वातावरण दु:खात बदललं; भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू, १६ जखमी

भाजप नेते प्रकाश जावडेकर यांची प्रतिक्रिया

भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी या छापेमारीवरुन काँग्रेसवर टीका केली आहे. 'काँग्रेस राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडून २०० कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाला सर्वच जाणून आहेत. लोकांनी त्यांचा राग व्यक्त करायला हवा, असे जावडेकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com