Uttar Pradesh News: लग्न घरातील आनंदी वातावरण दु:खात बदललं; भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Uttar Pradesh Latest News In Marathi: उत्तर प्रदेशच्या मऊ या भागातून धक्कादायक घटना घडली आहे. मऊ या ठिकाणी निर्माणाधीन घराची भिंत कोसळल्यानंतर मलब्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Uttar Pradesh News
Uttar Pradesh NewsGoogle
Published On

Uttar Pradesh Latest News:

उत्तर प्रदेशच्या मऊ या भागातून धक्कादायक घटना घडली आहे. मऊ या ठिकाणी निर्माणाधीन घराची भिंत कोसळल्यानंतर मलब्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेआधी घटनास्थळाजवळ एका कुटुंबाकडून लग्नाची तयारी सुरु होती. या दुर्घटनेनंतर ५ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातील आनंदी वातावरण दु:खात बदललं आहे. (Latest Marathi News)

उत्तर प्रदेशच्या मऊ येथे लग्नाच्या धावपळीदरम्यान भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घेटनेतील मलब्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. घटनास्थळावरील मलबा काढण्याचंही काम सुरु आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uttar Pradesh News
National Politics News: भूपेश बघेल यांना हायकमांडने बोलवलं दिल्लीत, छत्तीसगडमध्ये आता विरोधी पक्षनेते कोण होणार?

बचाव पथक घटनास्थळी

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घेटनेत २२ लोक मलब्याखाली अडकले होते. यातील सर्व जणांना मलब्यातून बाहेर काढलं आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

दुर्घटनेवर जिल्हा अधिकारी अरुण कुमार यांची प्रतिक्रिया

जिल्हा अधिकारी अरुण कुमार म्हणाले, 'लग्न घरातील महिलांकडून हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती. त्याचवेळी भिंत या महिलांवर कोसळली. या दुर्घटनेत २२ जण मलब्याखाली दबले. यात २० महिला आणि २ मुलांचा सामावेश होते. या घटनेत ४ महिला आणि १ लहान मुलाचा मृत्यू झाला आहे'.

Uttar Pradesh News
UP News: धक्कादायक! वीजबिल वसुली करणाऱ्या पथकावर घरमालकानं सोडला कुत्रा; कर्मचाऱ्यांनी वेगाने धावत वाचवला जीव, काही जखमी

मलब्याखाली २ मुलांसहित २० महिला दबल्या

दुर्घटनेनंतर जखमींना रुग्णालयातील फातिमा रुग्णालय आणि प्रकाश रुग्णालयातील दाखल केलं. घटना घडल्यानंतर सर्व डॉक्टर, अधिकारी आणि पोलीस दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावपथकाने मलब्याखालील सर्व लोकांना बाहेर काढलं आहे. सध्या मलब्याखाली एकही जण अडकलेला नसून सर्वांना बाहेर काढण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com