UP News: धक्कादायक! वीजबिल वसुली करणाऱ्या पथकावर घरमालकानं सोडला कुत्रा; कर्मचाऱ्यांनी वेगाने धावत वाचवला जीव, काही जखमी

UP Bulandshahar Latest News : यासोबत या घरमालकाने वीज कंपनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचाही प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
stray dog
stray dog Saam Tv
Published On

UP Bulandshahar Latest News:

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातून एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. वीज बिलाची वसुली करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरमालकाने कुत्रा सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कुत्र्याने कर्मचाऱ्यांना चावून जखमी केल्याची प्रकार समोर आलं आहे. यासोबत या घरमालकाने वीज कंपनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचाही प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

वीज विभागाच्या कर्मचाऱ्यावर कुत्रा सोडल्यानंतर घर मालक आणि त्याच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर जखमी कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

stray dog
Shocking News: शाळेत जात नाही म्हणून आई रागावली; १३ वर्षीय मुलीने धावत्या ट्रेनसमोर मारली उडी; खळबळजनक घटना

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहराच्या कोतवाली क्षेत्रातील अंबा कॉलनी भागात ही घटना घडली आहे. वीज विभागाचे कर्मचारी हे वीजचोरीच्या दंड वसुलीसाठी आले होते. पथकात एसडीए रेणू शर्मा, जेई ज्योती भास्कर आणि इतर विभागाचे कर्मचारी सामील झाला होता. या घर मालकाने ३ लाख ५७ हजार रुपयांचं वीजबिल थकवलं होतं.

stray dog
K Chandrashekar Rao: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री पाय घसरून पडले; रुग्णालयात उपचार सुरू, नेमकं काय घडलं?

वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीजबिल भरण्यासाठी सांगितलं. त्यानंतर घरमालकाच्या मुलाने वीजबिल भरण्यास नकार दिला. विजबिल वसुलीवरून कर्मचारी आणि घरमालकामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर घरमालकाने घरातील पाळीव कुत्रा त्यांच्या अंगावर सोडला. या कुत्र्याने चावा घेत कर्मचाऱ्यांना जखमी केलं आहे. या कर्मचाऱ्यांनी वेगाने धाव घेत जीव वाचवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com