Solapur Bank Election News  AI Image
महाराष्ट्र

Election Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयकुमार गोरेंना धक्का, मोहिते पाटलांच्या पॅनलचा पहिला उमेदवार विजय

Solapur Bank Election Result News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय. अर्जुनसिंह मोहिते पाटील माळशिरसमधून विजयी, तर सांगोल्यात आमदार बाबासाहेब देशमुखांची बाजी.

Alisha Khedekar

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. पहिल्याच निकालात जयकुमार गोरे यांना मोठा धक्का मिळाला आहे. मतमोजणीतील पहिला निकाल मोहिते पाटील गटाच्या बाजूने लागला आहे. माळशिरस विकास सोसायटी मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचे उमेदवार शहाजीराव ऊर्फ बाबाराजे देशमुख यांचा ५० मतांच्या फरकाने पराभव केला.

या निवडणुकीत अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना ८३ मते मिळाली, तर बाबाराजे देशमुख यांना ३३ मते मिळाली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मतमोजणीत मोहिते पाटील गटाने पहिला विजय मिळवत आघाडी घेतली. मात्र, मतमोजणी सुरू असतानाच दुसरा निकाल भाजपप्रणित सहकार विकास पॅनलच्या बाजूने लागला. सांगोला सोसायटी मतदारसंघातून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विजय मिळवत भाजपच्या पॅनलचे खाते उघडले. त्यांनी मोहिते पाटील गटाचे उमेदवार संजय इंगोले यांचा पराभव केला. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना ६० मते मिळाली, तर संजय इंगोले यांना १५ मते मिळाली. या मतदारसंघात ५ मते बाद ठरली.

दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक-दोन जागा वगळता आमच्या पॅनलचे बहुतांश उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे पुढील निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी तब्बल आठ वर्षांनंतर २६ नोव्हेंबर रोजी मतदान झाले.

बँकेच्या एकूण १९ जागांपैकी १० जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत ८६.९४ टक्के मतदान झाले होते. अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक १०० टक्के मतदान झाले, तर उत्तर सोलापूरमध्ये सर्वात कमी ७१.२५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. आता उर्वरित मतदारसंघांचे निकाल काय लागतात आणि जिल्हा बँकेवर कोणत्या गटाचे वर्चस्व राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार घेतील तो निर्णय मान्य; जिल्हाध्यक्षांचा सकारात्मक कल

Political News: मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, सर्व खासदारांना तातडीने व्हिप जारी

Anganwadi Sevika Salary: अंगणवाडी सेविकांच्या खात्यात येणार २ हजार रुपये? सरकारचा नवा निर्णय

IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंड 110/1 वरून 110/4; 18 चेंडूंत टीम इंडियाने कसा फिरवला सामना? नेमकं काय घडलं पाहा Video

गादी स्वच्छ कशी करायची? जाणून घ्या सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT