अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद.
अर्ज बाद झाल्यानंतर भाजप नेते राजन पाटील समर्थकांचा जल्लोष
बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना थेट चॅलेंज.
बाळराजे पाटील यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल.
Solapur Anagar nagar Panchayat Election 2025 : सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या वर्चस्व असलेल्या अनगरच्या बिनविरोधच्या परंपरेला ब्रेक लागला होता. अनगरच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटेंनी पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राजन पाटील समर्थकांनी नगरपंचायतीसमोर जल्लोष केला. या वेळी पाटील यांचे थोरले चिरंजीव बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज केले आहे. या व्हिडिओने राज्यात खळबळ उडाली.
अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाचा आज बाद झाल्यावर भाजपच्या राजन पाटील समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. राजन पाटलांच्या मुलाने थेट अजित पवारांना चॅलेंज दिले. '' अजित पवार कोणाचा पण नाद करा पण अनगरकरांचा नाही" असे म्हटले. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा दावा करत भाजपच्या राजन पाटील आणि त्यांचे पुत्र अजिंक्यराणा आणि बाळराजे पाटलांनी जोरदार जल्लोष केला. अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही, असे थेट बाळराजे पाटील यांनी चॅलेंज दिल्याचे दिसतेय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भयानक व्हायरल झाला. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी टीका केली.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्वला थिटे आज सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. अनगर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज सूचकाची सही नसल्यामुळे बाद केला होता. उज्वला थिटे आज छाननी अर्ज बाद झाल्यानंतर या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहेत. माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात अर्ज भरला होता. उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाकडून काय निर्णय दिला जातो याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.