Solapur News Saam Tv
महाराष्ट्र

सोलापूरमध्ये अग्नितांडव! कारखान्याच्या आगीत मालकासह ४ कुटुंबियांचा मृत्यू, एका वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश

Solapur News : सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसी रोड मधील सेंट्रल इंडस्ट्रीज कारखान्यात लागलेल्या आगीत तब्बल ८ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. यात कारखान्याचे मालक आणि त्यांच्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Yash Shirke

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

सोलापूरमधील अक्कलकोटच्या एमआयडीसी रोड येथील सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्यात आग लागली. यात तब्बल ८ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. ज्या लोकांना कारखान्यातून बाहेर काढण्यात आले, ते देखील मृत अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कारखान्याचे मालक, त्यांचा मुलगा, त्याची पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. संध्याकाळी आग पुन्हा धुमसल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोटच्या एमआयडीसी रोड येथील सेंट्रल इंडस्ट्रीज कारखान्यात पहाटे साडेपाचच्या सुमारास तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. सेंटर इंडस्ट्रीजचे मालक आगीत अडकल्याने त्यांना शोधण्यासाठीची मोहीम पहाटेपासून सुरु होती. सर्वजण मास्टर बेडरूममध्ये लपून बसले होते. दुर्दैवाने त्यांना बाहेर पडला आले नाही. श्वास गुदमरुन आणि होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. आगीमध्ये ५ पुरुष, २ महिला आणि एका बालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. यात कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी, मालकाचा मुलगा अनस मन्सूरी (वय २५), त्याची पत्नी शिफा (वय २४) आणि त्याचा एका वर्षाचा मुलगा युसुफ यांचा समावेश आहे.

या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी विनंती सरकारकडे करण्यात आली आहे. आग विझवण्यात महापालिकेची यंत्रणा कमी पडल्याचा आरोप केला जात आहे. आग विझवण्यासाठी पाणी कमी पडत होते. जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन खासगी टँकरनी पाणी मागवून घेण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर काहीतासांमध्ये आग पुन्हा धुमसली. अग्नितांडवावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT