Solapur Airport Saam tv
महाराष्ट्र

Solapur Airport: सोलापुरकरांसाठी आनंदाची बातमी! १ नोव्हेंबरपासून विमानसेवा दररोज सुरू राहणार; तिकीटाचे दर किती?

Good News for Solapur Residents: सोलापूर ते मुंबई असा विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर विमानतळावरून १ नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा सुरू राहणार आहे. सध्या आठवड्यातील ४ दिवस विमानसेवा सुरू आहे.

Priya More

Summary -

  • सोलापूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

  • १ नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा सुरू होणार.

  • सध्या आठवड्यात चार दिवसच विमानसेवा आहे सुरू

  • स्टार एअरची ही सेवा सोलापूर-मुंबईदरम्यान प्रवासासाठी उपयुक्त ठरेल

सोलापुरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकताच सुरू झालेल्या सोलापूर विमानतळाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सोलापूर विमानतळावरून दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. सध्या फक्त आठवड्यातील ४ दिवस याठिकाणावरून विमानसेवा सुरू आहे. १ नोव्हेंबरपासून याठिकाणावरून दररोज विमानसेवा सुरू होईल. प्रवाशांना याचा चांगला फायदा होईल. सोलापूर विमानतळावरून सोलापूर आणि मुंबईदरम्यान विमानसेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू झाली. सोलापुरातून विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला त्याचसोबत त्यांच्या प्रवासाच्या वेळेतही मोठी बचत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. १ नोव्हेंबरपासून याठिकाणावरून दररोज विमानसेवा सुरू राहिल.सध्या आठवड्यातून चार दिवस सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू आहे. सोलापूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या आणि सोलापूरकरांची मागणी लक्षात घेता दररोज विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मिळाल्याने आता सोलापूर ते मुंबई दररोज विमानसेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांना आणि मुंबईकरांना १ नोव्हेंबरपासून दररोज विमान प्रवास करता येणार आहे. स्टार एअरलाइन्सच्या या निर्णयाचे सोलापूरकरांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सोलापूर विमानतळावरून सध्या सोलापूर ते मुंबई विमानसेवा मंगळवारी, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी सुरू आहे.

सोलापूर ते मुंबई आणि मुंबईत ते सोलापूर या प्रवासासाठी प्रवाशांना १ तास ५ मिनिटं ते १ तास २० मिनिटांचा कालावधी लागतो. हा विमान प्रवास ४७६ किलोमीटर इतका आहे. या विमान प्रवासासाठी प्रवाशांना तिकीटासाठी सुरूवातीचे दर ३५०० रुपयांपासून सुरू होतात. तुम्ही विमान प्रवासासाठी स्टार एअरच्या वेबसाइटवर (starair.in) त्याचसोबत Yatra, Goibibo सारख्या प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुकिंग करू शकता.

वेळापत्रक -

मुंबई ते सोलापूर -

मुंबईवरून दुपारी १२.५० ला निघालेले विमान सोलापुरात दुपारी २.१० वाजता पोहचेल. या प्रवासासाठी १ तास २० मिनिट कालावाधी लागेल. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार विमानसेवा सुरू असते. १ नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा सुरू राहिली.

सोलापूर ते मुंबई -

सोलापूरवरून दुपारी १२.४० ला निघालेले विमान मुंबईत दुपारी ३.४५ वाजता पोहचेल. या प्रवासासाठी १ तास ५ मिनिट कालावाधी लागेल. सध्या मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी ही विमानसेवा सुरू आहे. १ नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा सुरू राहिली.

तिकीटाचे दर -

- प्रारंभिक दर - ३,९९९ रुपये (एकतर्फी, सर्व समावेशक).

- सध्याचे कमी दर - ३,४९९ रुपयांपासून सुरू.

- Flexi आणि Comfort प्रकारांसाठी - ४,२८६ ते ५,३३६ रुपयांपर्यंत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उमेदवारी अर्ज माघारी घेण्याकरता अजित पवार गटाकडून २० लाख रुपये दिल्याचा आरोप

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

Monday Horoscope : श्री गणरायांची कृपादृष्टी पडणार; ५ राशींच्या लोकांना मिळणार शुभसंकेत

लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

शिवसेना शिंदे गटाला गळती; बड्या महिला नेत्यानं सोडली साथ, भाजपचं कमळ घेतलं हाती

SCROLL FOR NEXT