Solapur Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Accident News: देवीची ज्योत घेऊन येताना काळाचा घाला! पिकअप व्हॅन उलटले, २ जण जागीच ठार; ६ गंभीर जखमी

Solapur Breaking News: भाविकांनी भरलेले पिकअप स्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात पलटी झाले. या घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झालेत.

विश्वभूषण लिमये

Solapur Accident News: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. राज्यभरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच सोलापूरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. तुळजापूरहुन ज्योत घेऊन येत असताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुळजापूरहुन ज्योत घेऊन येत असताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तुळजापूरहुन मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीकडे जाताना कामती येथे हा दुर्दैवी अपघात झाला. भाविकांनी भरलेले पिकअप स्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात पलटी झाले. या घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झालेत.

प्रदीप क्षीरसागर आणि नेताजी कराळे अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर बाकीचे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णाकायात दाखल केले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT