सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप टेम्पो विहिरीत कोसळून 14 भाविकांचा मृत्यू.
मृत सर्व भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे होते.
सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली.
सोलापूरमधील माळशिरसमधील एका शेतात असलेल्या विहिरीत एक पिकअप टेम्पो कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून त्यातून ८ जणांचे मृतदेह विहिरीत बाहेर काढण्यात आली आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार टेम्पोमधील सर्वजण देवदर्शनाला गेले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. हे सर्व भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे होते. दरम्यान क्रेनद्वारे विहिरीतून पिकअप टेम्पो बाहेर काढली जात आहे.
टेम्पो मधील हे सर्व भाविक रांजणी गावचे होते. म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक आले होते. देवाचे दर्शन घेऊन गावी परत विहिरीत त्यांचे पिकअप टेम्पो विहिरीत कोसळले. माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक असलेल्या एका शेतात विहिरीत पिकअप टेम्पो कोसळला. त्यानंतर, स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र, वाहनातील भाविकांची मृत्यू झाल्याची माहिती आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ज्या विहिरीत पिकअप टेम्पो कोसळला त्याला कोणताच प्रकारचा कठडा नव्हता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलं आहे. अग्निशामक दलाची यंत्रणा बोलावली आहे. प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासनाची टीम रवाना झाली आहे. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु झालं आहे. आमदार उत्तम जानकर हे घटनास्थळाकडे निघाले आहेत. या अपघाताबाबत माहिती देताना उत्तम जानकर यांनी सांगितलं की, हा अपघात माझ्या तालुक्यात घडला आहे.
तांदुळवाडीतील एका शेतात एक मोकळी विहीर आहे, त्यात पिकअप वाहन कोसळलं. माजी आमदार राम सातपुते म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. अपघात घडला तेथे एक विहीर होती.वाहनाला काही अडथळा नव्हता. पण पिकअप टेम्पो त्यात विहिरीत कोसळलं आहे. कारण विहिरीला कोणताच कठडा नव्हता किंवा संरक्षण भिंत नव्हती.
एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने एक कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभरातील उघड्या विहिरींचा प्रश्न उद्भवला होता. आता पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रस्त्याच्याकडेला असलेल्या भल्यामोठ्या विहिरीत पिकअप टेम्पो कोसळल्याची घटना घडली आहे.
नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावामधील दरगुडे कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला होता. इंदोरे गावचे रहिवासी सुनील दरगुडे आणि त्यांचे कुटुंबीय एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी परतत होते. मात्र, वाटेत अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याशेजारील खोल विहिरीत कोसळले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.