एसटीत असलेल्या सापाला सर्पमित्राच्या मदतीने पकडण्यात आले. 
महाराष्ट्र

विनातिकिट, फुल्ल टेन्शन! सापाचा भिंवडी ते कल्याण प्रवास

प्रदीप भणगे

कल्याण ः कल्याण-शहापूर बस डेपोतील राज्य परिवहन महामंडळाची एक बस घेऊन चालक राहूल कलाने हे भिवंडीहून कल्याणला निघाले. बसमध्ये प्रवासीदेखील मोठ्या प्रमाणात होते. अर्ध्या रस्त्यात आल्यावर बसमध्ये चालक आणि प्रवाशांना एक साप दिसून आला.

साप पाहताच सर्वच प्रवाशांची भंबेरी उडाली. चालक आणि वाहकही घाबरले. चालकाने त्वरीत कल्याण एसटी डेपोला याची माहिती दिली. एसटी डेपोतील अधिकाऱ्यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना सांगितले. बोंबे यांनी चालकाला घाबरु नका. बस डेपोत घेऊन या असा सल्ला दिला. ही बस कल्याण बस डेपोत पोहचली. Snakes journey from Bhiwandi to Kalyan

कल्याण डेपोच्या कार्यशाळेतील मॅकेनिक बसमध्ये चढले. त्यांनी पत्रा कापला असता त्याखाली साप दिसला. हा तस्कर जातीचा साप आहे. हा साप विषारी नाही. या तस्कर सापाचा भिवंडी-कल्याण प्रवासात बसमध्ये एकच खबबळ उडाली होती. त्याला जंगलात सोडण्यात आले.

भिवंडी येथून बस घेऊन कल्याणकडे निघालो होतो. प्रवास केल्यानंतर काही अंतर गेल्यावर मला बसमध्ये साप असल्याचे दिसले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. आणि बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. आगारप्रमुखांना संपर्क करून सर्पमित्राला बोलावले. आणि सुरक्षितरित्या तो साप पकडला. त्यामुळे सर्वांचा जीव वाचला. Snakes journey from Bhiwandi to Kalyan

- राहुल कलाने, बस चालक

एस टी बसमध्ये साप असल्याचा चालक कलाने यांचा फोन आला. त्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. तसेच बस कल्याण डेपोत आणण्यास सांगितले. तोपर्यंत सर्पमित्रांना बोलावून घेतले. त्यांनी तो सापडला आहे. कोणालाच कोणताही धोका नाही. सापालाही जीवदान दिले आहे. चालक-वाहकाने ही परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याने त्यांचे अभिनंदन.

- विजय गायकवाड व्यवस्थापक कल्याण बस डेपो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Hegde: कांजिवरम साडीत खुललं पूजा हेगडेचं सौंदर्य, फोटो पाहताच मन झालं घायाळ

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

Genelia Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनबाईंचा स्वॅग भारी!

Indian Railway : रेल्वेची आरक्षण यादी ८ तास आधी जाहीर होणार | VIDEO

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या नादाला लागू नको नाहीतर पटकनी काय आहे ते दाखवू-राऊतांचा दुबेंना इशारा

SCROLL FOR NEXT