Shirpur Snake Birthday Celebration viral video  Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Shirpur Snake Birthday Celebration viral video : सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी आजची तरुणाई काय करील याचा नेम नाही. धुळ्यातील एका सर्पमित्राचा थिल्लरपणा त्यांच्या अंगलट आलाय. पाहूया या तरुणाने नेमके काय केलं?

Suprim Maskar

तलवारीने केक कापणे, गाडीच्या बोनेटवर बसून बर्थ डे सेलिब्रेशन तुम्ही पाहिलं असेल...पण तुम्हाला आश्चर्य वाटेल चक्क एका नागोबाचा बर्थ डे साजरा झालाय. सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी, व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल याचा नेमच नाही. रिल्ससाठी तरुणाई कोणत्या थराला जाईल याचा आपण विचारचं करायला नको.. आता धुळ्यातील शिरपूर मधील या पठ्ठ्यान 'बड्डे आहे भावाचा' असं म्हणत चक्क कोब्रा नागाचा वाढदिवस साजरा केला आहे.

कोब्राचा वाढदिवस साजरा करणारा हा वाघ.. म्हणजे राज वाघ हा स्वत: एक सर्पमित्र आहे..बोराडी येथील एका घरातून त्यानं हा नाग रेस्क्यू केला होता..त्यानंतर नागपंचमीला त्या नागाचा वाढदिवस साजरा करण्याचं नसतं धाडस या तरुणानं केलं.. जे त्याला चांगलचं महागात पडलयं.. वनविभागाने गुन्हा दाखल घेत त्याला ताब्यात घेतलंय.

सोशल मीडियावरील पोस्टसाठी सर्पमित्रानं केलेला हा थिल्लरपणा त्याच्या अगलंट आलाय. मात्र इतर ठिकाणीही अशाच पद्धतीनं वन्यजीवांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो..सर्पमित्रांकडून जनजागृती अपेक्षित आहे. मात्र काही सर्पमित्रांची सोशल मीडियावरची अशा पद्धतीची शो बाजी दुर्देवी म्हणावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: शरीराच्या 'या' भागातील वेदना सांगतात लिव्हर कॅन्सर झालाय; चुकूनही दुर्लक्ष करू नका

मीनाताई ठाकरेंच्या स्मृती स्थळावर लाल रंग लावला, शिवसैनिक आक्रमक, दादरमध्ये तणाव वाढला

Kolhapur : कोल्हापुरात आज दिवसभर अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद | VIDEO

Maharashtra Live News Update: बापाची मुलाने केली हत्या, पोलीस भरतीसाठी पैसे न दिल्याने घेतला जीव

Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाला सुरूवात, ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा नेमकं काय म्हणाले

SCROLL FOR NEXT