Cricketer Smriti Mandhana Halts Wedding as Father Hospitalized Saam
महाराष्ट्र

लेकीसोबत गाण्यावर ठेका अन् मायेनं हात फिरवला; स्मृती मानधनाच्या वडिलांचा ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वीचा VIDEO व्हायरल

Cricketer Smriti Mandhana Halts Wedding as Father Hospitalized: स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांचे संगीत फंक्शनमधला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं २३ नोव्हेंबर रोजी लग्न पार पडणार होतं. दोन्ही कुटुंब आनंदात दिसत होते. मात्र, लग्न लागण्याच्या आधी एक अनेपक्षित घटना घडली. स्मृती मानधनाच्या वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आला. स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांची सकाळपासूनच तब्येत बिघडली होती. मात्र, ऐन लग्नात त्यांची प्रकृती खालावली आणि ह्रदयविकाराचा झटका आला. दरम्यान, या कठीण प्रसंगी त्यांनी तत्काळ लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

श्रीनिवास मानधना यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करीत आहेत. दरम्यान, स्मृती मानधना यांचं लग्न पुढे ढकललं गेल्याने चाहत्यांना धक्काच बसला आहे. चाहते आणि नेटकऱ्यांनी श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली.

दरम्यान, मानधना कुटुंबाचे लग्नाआधीच्या सोहळ्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. श्रीनिवास मानधना यांनी लग्न होण्याआधी संगीत कार्यक्रमात ठेका धरला. 'कुडमाई' या गाण्यावर त्यांनी नृत्य केले. या गाण्यावर श्रीनिवास नृत्य करत आपल्या लेकीवर मायेचा हात फिरवत असल्याचं दिसून येत आहे.

तर, व्हायरल दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्नीनिवास मानधना आपल्या लेकीसह ठेका धरताना दिसत आहेत. बाप लेकीचं हे प्रेम पाहून अनेकांचे डोळे पाणावले. सध्या हे दोन्ही व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले आहेत. अशा आनंदाच्या क्षणी श्रीनिवास यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यामुळे मानधना कुटुंबियांनी तत्काळ लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पायलटकडून क्रू-मेंबर तरुणीवर बलात्कार, फाईव्ह स्टार हॉटेलच्या खोलीत खेचत नेलं अन्...

Hill Stations For Couples : भारतातील या ५ हिल स्टेशनवर कप्लसने एकदा तरी गेलेचं पाहिजे

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, २२ जण जखमी

Maharashtra Winter Tourism: हिवाळ्यात महाराष्ट्रातील 'ही' ८ ठिकाणे करा एक्सप्लोर, हिरव्या गार निसर्गाच्या कुशीत हरवून जाल

Success Story: अभिमानास्पद! माढ्याच्या ९ तरुणांची एकाचवेळी सैन्य दलात निवड; गावकऱ्यांनी केला जल्लोष

SCROLL FOR NEXT