SMRITI MANDHANA’S WEDDING: FATHER AND FIANCÉ FALL ILL saam tv
महाराष्ट्र

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

Smriti Mandhan Fiance Health Update: स्मृती मानधनाच्या वडिलांच्या पाठोपाठ पती पलाश मुछल याचीही प्रकृती बिघडली. एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन पलाश हॉटलकडे रवाना झालाय.

Bharat Jadhav

  • पलाश मुछल याचीही प्रकृती बिघडली

  • सांगलीमधील एका खासगी रुग्णालयात घेतले उपचार

  • पित्त वाढल्याने पलाशने उपचार घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

विजय पाटील, साम प्रतिनिधी

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनावर दुसरं संकट आलंय.स्मृतीच्या विवाह समारंभाआधी तिच्या वडिलांना सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यानंतर आता हाती आलेल्या माहितीनुसार, स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजेच पलाश मुछल याचीही प्रकृती बिघडली आहे.

वडिलांच्या पाठोपाठ पलाश मुछल याचीही प्रकृती बिघडल्यानं लग्न घरी चिंतेचं वातावरण पसरलंय. पलाश मुछलची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपाचर करून त्याला परत घरी सोडलंय. हाती आलेल्या माहितीनुसार, पलाश मुछल याला व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. शरिरातील पित्त वाढल्याने आपण रुग्णालयात गेलो होतो, असं त्याने माध्याम प्रतिनिधींना माहिती दिलीय.

स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत अपडेट

स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. त्यामुळे स्मृती मानधनाचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलाय. गेल्या ३ दिवसांपासून या लग्न सोहळ्याची तयारी सुरू होती. वेगवेगळे इव्हेंट्स या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने पार पडत होते. आज सायंकाळी मुख्य लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र त्याआधीच स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ट्रॅव्हल्स अडवून चंद्रपूरच्या काँग्रेस नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी

Ajit Pawar Death: अजितदादांना भरसभेत ‘I Love You’ म्हणणारा कार्यकर्ता ढसाढसा रडला; म्हणाला, दादांना मेसेज पाठवला अन्...VIDEO

Shocking: हादरवणारं दृश्य, नवरा-बायकोचे मृतदेह बेडरूममध्ये, ३ मुलं...त्या भयाण रात्री घरात नेमकं काय घडलं?

Wedding Hair Style: लग्नसराईसाठी साडीवर या ५ सुंदर आणि ट्रेंडिंग हेअरस्टाईल नक्की ट्राय करा

Evening Yoga Tips : योगा संध्याकाळी करावा की नाही?

SCROLL FOR NEXT