wardha News  Saam TV
महाराष्ट्र

Marathi Sahitya Sammelan : अखिल भारतीय साहित्य संमेलनात गोंधळ, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची घोषणाबाजी

Wardha Sahitya Sammelan: विदर्भवाद्यांनी तेथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना या गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

वर्धा : 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही विदर्भवाद्यांनी तेथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

विदर्भवाद्यांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी कागद देखील भिरकावले. अखिल भारतीय साहित्य संमेलन विदर्भात होत आहे. बेळगावच्या साहित्य संमेलनात वेगळ्या महाराष्ट्राचा ठराव मांडला गेला तसाच ठराव वर्ध्यातील साहित्य संमेलनात मांडला जावा अशी आम्हा विदर्भवाद्यांची इच्छा असल्याचं गोंधळ घालणाऱ्यांनी म्हटलं. (Wardha News)

विदर्भावर नेहमीच अन्याय होत आला आहे. तरुण मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. तरुणांच्या हाताला नोकऱ्या नाहीत. तसेच विदर्भातील शेतकरी अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. मात्र सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे वेगळा विदर्भ आणि आपल्या इतर मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भावाद्यांनी आंदोलन केलं.

सरकारची दारे २४ तास तुमच्यासाठी उघडी- मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांनी म्हणालं की, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहेत. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे २४ तास तुमच्यासाठी उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवाद्यांना केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Politics: रायगडचे राजकारण तापलं! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेसेनेसोबत आघाडी; तटकरेंचा इन्कार, म्हणाले...

Dahi Vada Recipe: साऊथ इंडियन स्टाईल दही वडा कसा बनवायचा?

Jio Cheapest Plan: जिओ यूजर्ससाठी खुशखबर! कमी किमतीत २८ दिवसांचे पाच बेस्ट रिचार्ज प्लॅन्स, किंमत किती?

Maharashtra Live News Update: मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना, काम कसं करणार?

SCROLL FOR NEXT