Pandharpur : विठ्ठल भेटीनंतर Amit Thackeray पंढरपुरात स्पष्टच बाेलले, हे समीकरण आम्ही बदलणारच !

देव दर्शनाने आपल्याला एक नवी ऊर्जा भेटते असेही अमित ठाकरे यांनी एका प्रश्नावर उत्तर देतना नमूद केले.
Amit Thackeray, Pandharpur
Amit Thackeray, Pandharpursaam tv
Published On

Amit Thackeray In Pandharpur : राज्यात विद्यार्थ्यांना वाहतुकीची समस्या मोठी भेडसावत आहे. एसटी बसेस वेळेवर येत नसल्याने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही प्रमुख अडचण दौऱ्यात दिसून आली आहे. यावर मनसे (mns) विद्यार्थी सेना ठोस पाऊल उचलेल अशी माहिती आज (शुक्रवार) मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (amit thackeray latest news) यांनी पंढरपूरात (pandharpur) दिली.

Amit Thackeray, Pandharpur
Pandharpur : पंढरपुर विषबाधा प्रकरण; किराणा दुकानावर फूड अँड ड्रगचा छापा; 55 हजारांचा माल जप्त

अमित ठाकरे हे आज सोलापूर जिल्हा दाै-यावर आले आहेत. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेवून दाै-याला प्रारंभ केला. त्यापुर्वी मनसेच्या वतीने ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्याता आले. चौफळा येथे क्रेनच्या सहाय्याने पाचशे किलोचा गुलाबाचा हार त्यांना घालण्यात आला. तेथून ते पायी मंदिरापर्यत आले. यावेळी वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांनी टाळमृदंगाच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

Amit Thackeray, Pandharpur
Ration : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; येत्या ७ ते ९ फेब्रुवारीला रेशन धान्य वाटप बंद राहणार, कारण...

माध्यमांशी बाेलताना अमित ठाकरे म्हणाले एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील आज आंदोलन करावे लागतय. त्याचबरोबर ग्रामीण भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आम्ही मुंबईत बसून सोडवू शकतो. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याने आपला हा महाराष्ट्र दौरा आहे. (Maharashtra News)

अमित ठाकरे पुढं म्हणाले राज्यात विद्यार्थ्यांना वाहतुकीची समस्या मोठी भेडसावत आहे. एसटी बसेस वेळेवर येत नसल्याने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही प्रमुख अडचण या दौऱ्यात आपल्याला दिसून आलीय. यावर मनसे विद्यार्थी सेना ठोस पाऊल उचलेल.

Amit Thackeray, Pandharpur
Positive News : रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; साेन्याचे दागिने केले परत, युवती खूष

दरम्यान मी कुठेही देव दर्शनाला गेलो तर देवाकडे काही मागत नाही. मात्र देव दर्शनाने आपल्याला एक नवी ऊर्जा भेटते असेही अमित ठाकरे यांनी एका प्रश्नावर उत्तर देतना नमूद केले. आगामी मुंबई महापालिकेत मनसे पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. निवडणूक हरली की राजसाहेब हारले आणि जिंकली की पक्ष जिंकला हे समीकरण आम्हाला बदलायचा आहे. मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील या निवडणुकीत संधी देणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com