Skymet monsoon forecast 2026 India rainfall prediction  saam tv
महाराष्ट्र

Skymet Weather : स्कायमेटनं वाढवलं शेतकऱ्यांचं टेन्शन, यंदा मान्सून दडी मारणार, अहवालात काय आहे?

monsoon forecast Skymet weather report : स्कायमेटच्या मान्सून अहवालानुसार यंदा एल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट गडद होत असून शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

Bharat Mohalkar

Skymet monsoon forecast 2026 India rainfall prediction : अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याचं स्कायमेट हवामान संस्थेच्या मान्सून अहवालानं टेन्शन वाढवलंय... नेमकं स्कायमेटच्या अहवालात काय आहे? कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये...

गेल्या वर्षी शेतकऱ्यांना झोडपणारा आणि राज्यात हाहाकार माजवणारा मान्सून यंदा मात्र दडी मारण्याची शक्यता आहे...आणि त्याला कारण ठरलंय एल निनो सक्रीय होण्याची शक्यता. त्यामुळेच जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय... त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलंय.

जून महिन्यात चांगल्या पावसाला सुरुवात होईल... मात्र जुलै महिन्यात पाऊसाची अनिश्चितता असल्यानं पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे. तर ऑगस्टमध्ये पावसात मोठी घट होऊ शकते... त्याबरोबरच सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊसाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय...

खरं तर स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज 40 टक्के आहे.. तर 30 टक्के दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असंही स्कायमेटनं म्हटलंय... त्यामुळे ही आकडेवारीच दुष्काळाचं सावट गडद होत असल्याचं स्पष्ट करतेय.

हवामान बदलामुळे अल निनो आणि एल निनोचा परिणाम जाणवतोय... त्यामुळे देशात कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ पडतो.. यंदाही दुष्काळ पडण्याची शक्यता असल्यानं राज्य सरकारने जिल्हानिहाय दुष्काळ व्यवस्थापन समिती स्थापन केलीय... ही समिती दुष्काळावर मात करण्यासाठी आणि चारा टंचाईवर उपाययोजना सुचवणार आहे... त्यामुळे सरकारनं दुष्काळाच्या विरोधात तयारी सुरु केली असली तरी राज्यातील शेतकऱ्यांनीही शेतीच्या मशागतीवेळी आणि पेरणीबाबत हवामान खात्याच्या सुचनांनुसारच पावलं टाकण्याची गरज आहे... त्यामुळे होणारं नुकसान टाळणं शक्य होईल...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत महिला पोलिसाची आत्महत्या, धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

Dahisar Tourism : दहिसरजवळील ५ 'सीक्रेट' पिकनिक स्पॉट्स, वीकेंड होईल एकदम खास

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'आप'चा राडा

ठाकरे गटानंतर आणखी एक मोठं 'ऑपरेशन'; २५ ते २६ खासदार फुटणार, देशाच्या राजकारणात खळबळ

तुकाराम मुंढेंचा मुंबईत कारवाईचा धडाका; FDA कडून २,५१० लिटर सॉस, ११.१९ लाखांचे एनर्जी ड्रिंक जप्त, व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT