Solapur News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Ujani Dam: शॉर्टकट जीवघेणार ठरला! बोटीने प्रवास करणारा एक अख्ख कुटुंब पुन्हा काठावर परतलंच नाही..

Solapur News: 90 किलोमिटरचा शॉर्टकट मारायला त्यांनी नदीतून जिवघेणा प्रवास केला. पण हा प्रवास एका कुटुंबाचा अखेरचा प्रवास ठरला. ज्या बोटीतून हे कुटुंब प्रवास करत होतं. ती बोट उलटली आणि एका क्षणात एका अख्ख्या कुटुंबाला जलसमाधी घ्यावी लागली.

साम टिव्ही ब्युरो

प्रसाद जगताप, साम टीव्ही प्रतिनिधी

90 किलोमिटरचा शॉर्टकट मारायला त्यांनी नदीतून जिवघेणा प्रवास केला. पण हा प्रवास एका कुटुंबाचा अखेरचा प्रवास ठरला. ज्या बोटीतून हे कुटुंब प्रवास करत होतं. ती बोट उलटली आणि एका क्षणात एका अख्ख्या कुटुंबाला जलसमाधी घ्यावी लागली. दीड वर्षाचा शुभम, तीन वर्षांची माही, त्यांची 25 वर्षांची आई आणि तिशी ओलांडलेले बाबा, मामाच्या गावाला जाताना वाटेतल्या उजनी धरणात त्यांच्यावर काळ चाल करुन आला.

चौघांसहीत अजून दोन लोकांनी या अघातात जीव गमावला. 90 किलोमीटरच अंतर कापण्यासाठीचा घेतलेला शॉर्टकट या लोकांच्या जिवावर बेतेलं. याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केलेली नसावी.

काळजाला चटका लावणारी घटना सोलापूरच्या करमाळा तालुक्यातली आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील गावकऱ्यांना बारामतीच्या इंदापूरला जायचं असेल, तर त्यांना गाडीने तब्बल 92 किलोमिटरचा प्रवास करावा लागतो. पण तोच प्रवास भिमानदीच्या पात्रातून बोटीद्वारे केला, तर अवघ्या 4 किलोमिटरचं अंतर कापून पूर्ण होतो. त्यामुळे बरेच गावकरी बोटीतून इंदापूर पर्यंतचा प्रवास करतात.

पण, हाच प्रवास गोकूळ जाधव, त्यांची पत्नी कोमल जाधव, त्यांचा दिड वर्षांचा मुलगा शुभम जाधव आणि तीन वर्षांची लेक माही जाधव. यांच्यासाठी अखेरचा ठरला. मूळचे करमाळा तालुक्यातील झरे गावचं हे कुटुंब इंदापूर तालुक्यातील कळाशीला मुलांच्या मामाच्या गावी निघालं होतं. दुचाकीवरुन हे कुटुंब करमाळ्याच्या कुगावपर्यंत आले. इथून त्यांनी मोटरसायकलसहीत बोटीने प्रवास सुरु केला.

या प्रवासात त्यांच्याबरोबर पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरे, त्यांचा मुलगा गौरव डोंगरे आणि बोटचालक अवघडे होते. म्हणजे बोटीत एकून 7 लोक प्रवास करत होते. अवघ्या काही मिनिटात बोट हे अंतर कापणार होती. पण, आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणाला पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता होती. जोरदारा वारा सुरु झाला होता.. अशा ढगाळ वातावरणात पुढे काय होईल? याची कुणालाच चाहूल नसताना.

बोट नदीच्या मधोमध आल्यावर पावसाच्या सरी सुरु झाल्या. सरींबरोबर जोरदार वाराही वाहत होता. अचानक वातावरणात बोट पाण्यावर गंटगळ्या खाऊ लागली. वाऱ्यामुळे नदितल्या पाण्याची हालचाल वाढली. बोट पाण्यावर हेलकावे खाऊ लागली. अशातच जोरदार पाण्याची एक लाट बोटीत शिरली आणि बोट थेट उलटी झाली.

एक अख्ख कुटुंब आणि त्यांच्याबरोबरचे तीन सहप्रवाशी आता पाण्यात जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. ते पाण्यात हातपाय तर मारत होते. पण त्यांना दूरदूर पर्यंत पाणीच पाणी दिसत होतं. करावं तरी काय? अशातच या दोन लहान लेकरांनी आपल्या आई वडिलांसमोरच दम तोडला. पाहता-पाहता बोटीतल्या 7 पैकी सहा लोकांची जलसमाधी घेतली. या अपघातातून फक्त पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरेच किनाऱ्यावर परतू शकले.

आपल्या लेकराला डोळ्यादेखत बुडताना पाहुन जड अंतकरणाने राहुल डोंगरे किनाऱ्यावर पोहचले होत. पोलिसात भरती होतांना त्यांनी घेतलेलं प्रशिक्षण त्यांच्या कामी आलं होतं. राहुल डोंगरेंनीच ही माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचवली. राहुल डोंगरेंची आवस्था आणि त्यांनी सांगितलेली कहाणी ऐकून गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

शोधमोहीम सुरु झाली. आपल्या गावातील गोकूळ जाधव आणि त्यांचं अख्ख कुटुंब नदीत बुडालंय. ही बातमी ऐकून गावकऱ्यांचं मन हेलावलं. त्या रात्री गावात कुणाच्याच घरात चूल पेटली नाही. गावकऱ्यांनी देव पाण्यात बुडवून ते सुखरुप असल्याची प्रार्थना केली. पण, गावकऱ्यांच्या प्रार्थनेचा फायदा झाला नाही. बचावपथकाला जाधव कुटुंब मिळालं. पण, त्यांनी कधीचाच जगाला निरोप दिला होता. ही घटना गावकऱ्यांच्या अंतरकणात एखाद्या काट्यासारखी रुतली.

फुलासारखे लहान मुल या घटनेत दगावल्यामुले अनेकांच्या काळजाचा पाझर फुटला. पण, नाईलाज होता. एक शॉर्टकट या सोन्यासारख्या कुटुंबावर काळ बनून आला. एक शॉर्टकट सगळंकाही उद्ध्वस्त करुन केला. एक शॉर्टकट तब्बल 6 लोकांचा जीव घेऊन गेला. हेच सत्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT