पुण्यात शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून वारंवार महायुती कायम असल्याचा दावा केला जात असला तरी पुण्यात शिंदेसेनेच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशीही अर्ज मागे न घेतल्यामुळे महायुतीत फूट पडल्याचं पाहायला मिळतयं...शिंदेसेनेनं स्वबळाचा नारा देत 123 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलयं. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या.
मात्र जागावाटपात भाजपनं शिंदेसेनेला फक्त 16 जागांचा प्रस्ताव दिल्यानं शिंदेसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
शिंदेसेनेचे नेते रवीँद्र धंगेकरांनी तर 165 जागांवर उमेदवारी द्यायला हवी होती, असं म्हणत भाजपविरोधात शड्डू ठोकलाय...
महायुतीतील तिनही पक्षांनी वेगळी चूल मांडल्यानं भाजपला पुण्यात सत्ता टिकवण्यासाठी कसं आव्हानं उभं राहणार?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं राजकीय समीकरण बदलली
'कॅडर' बेस वाचवणे आणि मतदारांना आपल्याकडे टिकवून ठेवणं
महायुतीतील मतांची विभागणी होऊन विरोधकांना फायदा
शिंदेसेनेच्या बंडखोरांमुळे भाजपची संघटनात्मक शक्ती विभागली जाणार
विरोधकांपेक्षा स्वकीयांशीच लढण्यात भाजपची ताकद खर्ची होणार
कोथरूड, हडपसर, कसब्यात भाजपपुढे राष्ट्रवादी- शिंदेसेनेचे मोठं आव्हानं
दुसरीकडे पुण्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे..या लढतीत नेमकं कोण बाजी मारतं? शिंदेसेनेच्या बंडखोरांना रोखणं भाजपला शक्य होतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.