Saturday Horoscope : लाडक्या गणरायाला काजळ लावून नारळ अर्पण करावं; मेषसह ५ राशींच्या लोकांची लॉटरी लागणार

Saturday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना भगवान गणरायाची उपासना करावी लागणार आहे. तर काहींना लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
Horoscope in Marathi
horoscope Saam tv
Published On

श्री वासुदेव सत्रे, ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

मेष - बिघडलेले संबंध सुधारतील. आर्थिक व्यवहार टाळावे. प्रेमात यशस्वी व्हाल. गोड पदार्थ दान करावा.

वृषभ - गुरू चे दर्शन घ्यावे किंवा स्मरण करावे. अध्यात्मिक प्रगती होईल आणि भविष्यातील शुभ घटनांचे संकेत भेटतील.

मिथुन - व्यावसायिकांसाठी अनेक संधी घेऊन येणारा दिवस आहे. उद्योगासाठी दिवसभर उपलब्ध रहा. कुलदेवतेचं नामस्मरण करा, शुभवार्ता भेटेल.

कर्क - मना ईतकी घाई त्रिभूवनात नाही. अशी मानसिक अवस्था होईल. संयम ठेवावा आणि शक्य तेवढे मौन पाळावे.

सिंह - आरोग्याच्या समस्या दूर होण्यास उपाय भेटतील. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. समाजात मानसन्मान लाभेल.

कन्या - "बडबड करीता ईच्छिले कार्य नासे" ही म्हण लक्षात ठेवून वागणूक ठेवा. स्त्रीयांना थोड्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या जाणवतील.

Horoscope in Marathi
Vastu Tips : श्रीमंतांच्या घरी 'या' वस्तूंनी होते भरभराट; जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

तुला - शंकराची उपासनाच येणाऱ्या संकटांचं हरण करेल. जबाबदारीची कामं शक्यतो टाळता आल्यास उत्तम. पांढरे पदार्थ खाऊन घरातच दिवस घालवलेला बरा.

वृश्चिक - जमिनीचे व्यवहार होतील. गणपतीला, काजळ लावून नारळ अर्पण करावं म्हणजे कार्यसिद्धी होईल. व्यवहारात गुप्तता ठेववी.

धनू - नवर्याकडून खूशखबर भेटेल. गृहिणींसाठी आनंदी दिवस आहे. व्यवस्थित सौभाग्य अलंकार धारण करून दिवसाच्या पहिल्या प्रहरी देवपूजा करावी.

Horoscope in Marathi
Vastu Tips : तुमच्या जवळील 'या' पाच गोष्टी कधीच कोणाला देऊ नका, नाहीतर येतील अडचणी

मकर - मानसिक ताण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. तुळशीत ठेवलेलं पाणी प्यावं. बिघडलेले नातेसंबंध सुधारतील.

कुंभ - नवीन नौकरी साठी प्रयत्न करा, सुखद यश भेटेल. आपल्या अपत्त्यांसोबत वेळ घालवा. येणारे काही दिवस अंगावर जास्त सोनं धारण करणं टाळावं.

मीन - खर्च जपून करा. " सर्वे गुणा: कांचनमाश्रीयंतम्" ही उक्ती लक्षात ठेवा. उसणे दिलेले पैसे परत येण्याचे योग आहेत. गोड पदार्थ खाऊन घराबाहेर निघा म्हणजे कार्यसिद्धी होईल.

Disclaimer - आर्टिकलमधील भाकीतं तज्ञांच्या अभ्यासावर अवलंबून असतात. साम टीव्हीवरील माहिती या सोबत सहमत असेलच असे नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com