jitendra awhad  saam tv
महाराष्ट्र

Jitendra Awhad: आव्हाडांच्या ट्विटर बॉम्बचे विधानपरिषदेत पडसाद, सदनिकांच्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार

नाशिक सदनिकांच्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार आहे.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक: गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटर बॉम्बचे विधानपरिषदेत पडसाद दिसून येत आहेत. आता सदनिकांच्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार आहे. महापालिका आयुक्तांच्या बदलीचे आदेश विधान परिषद सभापतींनी दिले आहेत (SIT probe into flats scam in Nashik pointed out by Minister Jitendra Awhad).

नाशिकमध्ये (Nashik) 1 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील बांधकामातील 20 टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाकडे वर्ग करण्याच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उघडकीस आणलं होतं. यात 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यासंदर्भात माहिती मागवूनही ती देण्यास महापालिकेकडून टाळाटाळ झाल्याचं ट्विटही आव्हाड यांनी केलं होतं. या प्रकरणाचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटलेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चेनंतर उत्तर देतांना जितेंद्र आव्हाड यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नियुक्त करण्याची घोषणा केली. यानंतर सभापती निंबाळकर यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत संबंधितांवर चौकशी अंती कारवाई करण्याबरोबरच अधिकाऱ्यांच्या तातडीने बदलीच्या सूचना दिल्यानं महापालिकेत चांगलीचं खळबळ उडालीये.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

SCROLL FOR NEXT