Buldana News Saam TV
महाराष्ट्र

Buldana News: हृदयद्रावक! प्रेमी युगुलाच्या आत्महत्येनं बाप खचला; दुसऱ्याच दिवशी स्व:ता घेतला जगाचा निरोप...

Father Eded Life: साखरखेर्डा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. दरम्यान, काल सायंकाळी या दोन्ही अस्पवयीन प्रेमी युगुलांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.

Ruchika Jadhav

संजय जाधव

Buldana News:

बुलडाण्यातील सिंदखेडराजा तालुक्यातून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल साखरखेर्डा येथील सूतगिरणी जवळ प्रेमीयुगलाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उजेडात आली होती. दरम्यान आता अल्पवयीन मुलीसोबत आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांनी देखील गळफास घेतला आहे. त्यामुळे बापलेकावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवीवेळ शेंदुर्जन वासियांवर आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

८ व्या वर्गात शिकणारी १३ वर्षीय मुलगी आणि २२ वर्षीय मुलगा हे दोघेही १८ डिसेंबरपासून बेपत्ता होते. मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. दरम्यान, काल सायंकाळी या दोन्ही अस्पवयीन प्रेमी युगुलांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.

दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले होते. आज दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मुलांनी टोकाचं पाऊल उचलल्याने दोघांच्याही पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलांच्या मनासारखं झालं असतं तर ते आज जीवंत असते, असा विचार करत दोन्ही कुटुंबातील माता-पितांनी टाहो फोडला.

मात्र आज सकाळी मुलाच्या वडीलांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या वस्तीतील पडक्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. आपल्या मुलाच्या निधनाचं दु:ख त्यांना पेलवलं नाही. पोटचा गोळा गेल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि या जगाला कायमचा रामराम ठोकला. या दु:खद घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

तळलेले की उकडीचे? गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणते मोदक बेस्ट, जाणून घ्या

आमच्या जवळच्या लोकांवर चौकशा का? जरांगेंचा सरकारवर निशाणा; ED च्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT