Sindhudurg Brother And Sister Death Saam Tv
महाराष्ट्र

Sindhudurg: बहिणीने तलावात उडी मारली, वाचवायला गेलेल्या भावाचाही मृत्यू; सिंधुदुर्ग हादरले

Sindhudurg Brother And Sister Death: सिंधुदुर्गमध्ये बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बहिणीने आत्महत्या करण्यासाठी तलावात उडी मारली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या भावाचाही मृत्यू झाला.

Priya More
  • सावंतवाडी मोती तलावात बहीण भावाचा बुडून मृत्यू

  • मोती तलावात बहिणीने उडी मारल्यानंतर भावाने तिला वाचवण्यासाठी उडी मारली

  • बहिणीला वाचवण्यासाठी तलावात उतरलेल्या भावाचाही मृत्यू

  • सावंतवाडी पोलिस या प्ररणाचा तपास सुरू आहे

सिंधुदुर्गमध्ये बहीण- भावाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. बहिणीने आत्महत्या करण्यासाठी तलावात उडी मारली तिला वाचवण्यासाठी गेलेल्या भावाचाही मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी येथील मोती तलावात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बहीण- भावाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. बहिणीने मोती तलावात उडी मारून आत्महत्या केली. तिला वाचवण्यासाठी तात्काळ तिच्या भावाने मोती तलावात उडी मारली. मात्र काही वेळ या भावाने बहिणीला मिठी मारून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा अंदाज चुकला आणि त्याचा सुद्धा तलावात बुडून मृत्यू झाला. सावंतवाडी येथील या घटनेने सर्वांची हृदय हेलावून टाकली आहेत.

रोहण गोसावी आणि लिशा गोसावी अशी मृ्त्यू झालेल्या बहीण- भावाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचा मृतदेह शोधण्यास सुरूवात केली. रोहणचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. तर त्याच्या बहिणीचा मृतदेह सापडला नाही. शोधमोहिम सुरू आहे. रोहणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. एकाच घरातील दोघांच्या मृत्यूमुळे गोसावी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांचे आई-वडील रडून रडून बेहाल झालेत.

लिशा गोसावीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली? यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करून घेत तपास सुरू केला आहे. पोलिस गोसावी कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. शहरातील मोती तलावात ही घटना त्यावेळी घडली जेव्हा अनेक जण तिथे उपस्थित होते. काही क्षणात दोघांचा जीव गेला. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

60 लाखांचं पॅकेज, 2 जुळी मुलं; इंजिनिअरच्या हत्येचं सासुरवाडी कनेक्शन आलं समोर...

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये दिवसभर वाहतूककोंडी; रात्रीही पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

Monsoon Tips : पावसाळ्यात तांदळामध्ये पडतायत किडे? 'या' ट्रिक्स करा फॉलो, मिनिटात होतील गायब

Beauty Tips : सकाळी आरशात चेहरा सुजलेला दिसतोय? 'या' घरगुती उपायांनी पफीनेस करा दूर

Rahul Gandhi Today Live: 'तुम्हाला काय वाटतं, तुम्ही नेमके काय विचार करता' हे सांगण्याची संधी देण्यासाठी आलोय : राहुल गांधी

SCROLL FOR NEXT