Sindhudurg Rain Saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात दमदार पाऊस; १५ धरणातून पाण्याचा विसर्ग

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरवातीपासूनच चांगला पाऊस होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १५०० मिमी एवढा पाऊस पडला आहे.

Rajesh Sonwane

विनायक वंजारे 

सिंधुदुर्ग : राज्यात मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. काही भागात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झाला असून बहुतांश धरण भरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील १५ धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात सुरवातीपासूनच चांगला पाऊस होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १५०० मिमी एवढा पाऊस पडला आहे. जिल्ह्यात दरवर्षी ३००० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडत असतो. यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दीड महिन्यातच दमदार पाऊस (Rain) झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेले देवघर व कोर्ले- सातंडी धरणं आणि लघु प्रकल्प असलेली शिवडाव, आंबोली, हातेरी, माडखोल, सनमटेंब, हरकुळ, ओझरम, निळेली, पावशी, पुळास, लोरे, शिरवळ या १३ धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. 

जिल्ह्यातील सर्व १३ छोटी धरणे १०० टक्के भरली आहेत. तर देवघर व कोर्ले ही दोन्ही धरणे ६० टक्केपेक्षा जास्त भरून गेली आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास ५० टक्के पाऊस पडला असून समाधानकारक पाणीसाठ्याचा संचय झाला आहे. पावसाळ्याच्या पुढील काही दिवसात आणखी दमदार पाऊस झाल्यास उर्वरित दोन्ही धरणे देखील १०० टक्के भरतील अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governmemt Job: सरकारी नोकरी अन् ८१००० रुपये पगार; BRO मध्ये ४६६ रिक्त पदांवर भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: मराठा उमेदवार ओळखा, कसब्यात लागले बॅनर

Solapur Politics: ...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही, शरद पवार गटाच्या नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

SCROLL FOR NEXT