BJP leader Sanmesh Parab dies in Malvan boat accident 
महाराष्ट्र

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Sindhudurg Fort Fishing boat accident :सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मालवण समुद्रात ‘सागरिका’ नौका बुडाल्याने भाजपचे मालवण तालुका उपाध्यक्ष सन्मेश सुरेश परब आणि खलाशी अक्षय राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मुलगा सुयोग याला मच्छीमारांनी सुखरूप वाचवले.

Namdeo Kumbhar

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग प्रतिनिधी

Malvan Boat Accident Death Toll : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रात आज पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना ‘सागरिका’ नावाची नौका अचानक समुद्रात बुडाली. या भीषण दुर्घटनेत भाजपाचे मालवण तालुका उपाध्यक्ष तथा नौका मालक सन्मेश सुरेश परब आणि त्यांचे खलाशी अक्षय हनुमंत राणे या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मालवण तालुका आणि भाजपच्या राजकीय वर्तुळात प्रचंड शोककळा पसरली आहे.

पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण येथील दांडी भागातील रहिवासी आणि भाजपचे तालुका उपाध्यक्ष सन्मेश सुरेश परब हे नेहमीप्रमाणे आपला मुलगा सुयोग परब आणि खलाशी अक्षय राणे यांच्यासोबत 'सागरिका' नौकेतून मासेमारीसाठी गेले होते. मात्र, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या नजीक पोहोचताच अचानक नौका खडकावर आदळल्याचा अंदाज आहे.

मुलाच्या डोळ्यांदेखत बापाचा दुर्दैवी अंत

या अपघाताचा प्रसंगावलोकन अत्यंत क्लेशदायक होता. नौका बुडू लागताच तिघांनीही जिवाच्या आकांताने पाण्यात हातपाय मारण्यास सुरुवात केली. सन्मेश परब यांचा मुलगा सुयोग याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत वडिलांना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, समुद्राच्या लाटांमुळे सुयोगच्या डोळ्यांदेखतच त्याचे वडील सन्मेश परब आणि खलाशी अक्षय राणे पाण्यात बुडाले. सुयोगने डोळ्यांसमोर आपल्या बापाला समुद्रात बुडताना पाहिले, परंतु लाटांच्या तीव्रतेमुळे तो असहाय्य ठरला.

'जयदेव लोणे' यांच्या नौकेमुळे सुयोगचा वाचला जीव

दरम्यान, अपघात घडल्याचे लक्षात येताच जवळच मासेमारी करत असलेले जयदेव लोणे यांनी अजिबात वेळ न गमावता बोटीसह मदतीसाठी धाव घेतली. जयदेव लोणे यांच्या नौकेने प्रसंगावधान राखून सुयोग परब याला तातडीने पाण्यातून बाहेर काढले, ज्यामुळे सुयोगचा जीव वाचला. मात्र दुर्दैवाने सन्मेश परब आणि अक्षय राणे या दोघांना वाचवण्यात यश आले नाही.

दांडी परिसरात शोककळा

स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने सन्मेश परब आणि अक्षय राणे या दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. भाजपच्या एका सक्रिय आणि अभ्यासू तालुकास्तरीय नेत्याचा, तसंच त्यांच्या सहकाऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने दांडी परिसर आणि संपूर्ण मालवण शहरावर दुःखाचे सावट पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT