Sindhudurg News  Saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg News : ZPच्या मुलांचा नाद नाय! गुरजींनी थेट विद्यार्थ्यांना बनवलं गाईड, व्हिडिओ पाहून चकीत व्हाल

Saam Tv

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

सिंधुदुर्ग : 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन असतो. या दिनाचं औतित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना पर्यटन आणि पर्यटन स्थळाची माहिती व्हावी यासाठी सिंदुधुर्गातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक जावेद तांबोळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पर्यटनस्थळी घेऊन जाऊन त्यांना पर्यटनाचे महत्त्व सांगितलं. या शिवाय चक्क जिल्हा परिषद शाळेची मुलं पर्यटकांचे गाईड बनले. या मुलांचा व्हिडिओ समोर आला आहे.

विद्यार्थ्यांनी ३ भाषेत दिली पर्यटकांना माहिती

विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी तीनही भाषेतल्या पर्यटकांना माहिती दिली. याठिकाणी आलेले परदेशी पर्यटक यांना त्यांच्याच भाषेत विद्यार्थ्यांनी माहिती दिली. या झेडपीच्या मुलांचं बोलणं पाहून परदेशी पर्यटकांना सुद्धा आश्चर्य वाटले तर त्यांना त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.

शिक्षकाच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक

राज्यातील सर्वात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीचं सौंदर्य पाहण्या साठी देशभरातून पर्यटक या ठिकाणी येतात. या पर्यटकांचे गाईड बनून त्यांना अतिशय उत्तमपणे माहिती दिली. या शाळेत नुकतेच हजर झालेले जावेद तांबोळी या शिक्षकाने मुलांना अभ्यासात गोडी निर्माण व्हावी, त्यांचा सर्वगुणसंपन्न विकास व्हावा यासाठी उपक्रमाच्या माध्यमातून अध्यापन करत असल्याने गावातील नागरिकांकडून त्यांचं कौतुक होतं आहे.

मुलांच्या चेहऱ्यांवर दिसला आनंद

झेडपी शाळेतील विद्यार्थ्याने मुलांना सांगितलं की, 'या धबधब्याच्या आजूबाजूला जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट्या, हरीण, साप असे प्राणी पाहायला मिळतात. या जंगलात मोठ्या प्रमाणात साप आढळून येतात'. विद्यार्थ्याने ही माहिती दिल्यानंतर शिक्षकांनी त्याचं कौतुक केलं. तसेच या विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य वातावरणाचा फिरण्याचा आनंद लुटला. धबधब्याच्या ठिकाणी फिरतानाचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video News : पुराच्या पाण्यात बैलगाडी टाकणं अंगलट; शेतकऱ्यासह ५ जण बुडाले; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Bigg Boss Marathi: "बिग बॉसची पहिली बायको.." राखी सांवतची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताच निक्कीची बोलती बंद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत कोणाला मिळणार १५०० रुपये अन् कोणाला ४५००? जाणून घ्या

Maharashtra Politics: राज्याचे मुख्यमंत्रीपद फिरते असावे?, अजित पवारांची अमित शहांकडे मागणी

Best Movies In India: पाथेर पांचाली, मसान ते सैराट... भाषांची मर्यादा तोडून हिट झालेले १० चित्रपट!

SCROLL FOR NEXT