Court Order
Court Order 
महाराष्ट्र

ताेपर्यंत जिल्हा बॅंकेचे निवडणुक घेऊ नये; उच्च न्यायालय

अनंत पाताडे

सिंधूदुर्ग : सिंधूदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर हाेण्यापुर्वी उच्च न्यायालयातून आलेल्या सूचनेमुळे तात्पूरता पुन्हा एकदा बाजूला राहिला आहे. येत्या दाेन दिवसांत उच्च न्यायालयातील निर्णयानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. sindhudurg-district-cooperative-bank-election-2021-program-mumbai-high-court-sml80

सिंधूदुर्ग जिल्हा बॅंकेच्या मतदार यादीतून नाव वगळल्याने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. मतदानाचा हक्क प्राप्त व्हावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली हाेती. उच्च न्यायालयात या संदर्भात मंगळवारी निर्णय अपेक्षित हाेता. परंतु उच्च न्यायालयात त्या संदर्भात काेणताही निर्णय झाला नाही.

दरम्यान जाेपर्यंत निकाल लाग नाही ताेपर्यंत निवडणुक घेऊन नये अशी सूचना उच्च न्यायालयातून सहकार प्राधिकरणास मिळाली आहे. या सूचनेमुळे सध्या तरी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करता येत नसल्याचे प्रांताधिकारी वंदना करमाळे यांनी नमूद केले.

येत्या २ दिवसांत याचिकेचा निकाल लागण्याची दाट शक्यता याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान मतदार यादीतून वगळलेल्यांमध्ये आमदार नितेश राणे यांची देखील संस्था अपात्र ठरवली गेली आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT