सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या विरोधात सिंधुदुर्गातील (sindhudurg) काँगेस आज आक्रमक झाली हाेती. माेदींनी काेराेना काॅंग्रेसमुळं वाढला असे वक्तव्य केले हाेते. त्याचा निषेध नाेंदविण्यासाठी काॅंग्रेसचे (congress) कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या कणकवली (kankavali) येथील बंगल्या बाहेर आंदोलन करण्यासाठी निघाले हाेते. दरम्यान कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अडवत पोलीसांनी त्यांची धरपकड केली आहे. (Sindhudurg Latest Marathi News)
काँगेसचे जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसनं हे आंदोलन छेडले. यावेळी गावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी (narendra modi) यांनी कॉंग्रेसने महाराष्ट्रातून देशभरात कोरोना पसरवला या त्यांच्या लोकसभेतील वक्तव्याचा आम्ही निषेध करताे असं म्हणत माेदींच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.
दरम्यान कॉग्रेसने इशारा दिल्या प्रमाणे त्यांच्यात हिमंत असेल तर राणेंच्या बांगल्याबाहेर येऊनचं दाखवावे. स्वतःच्या पायावर मागे जाणार नाहीत असा इशारा राणे समर्थकांनी काॅंग्रेस कार्यकर्त्यांना दिला आहे. यामुळे कणकवलीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल. मंत्री नारायण राणेंच्या बांगल्याबाहेर समर्थक एकवटलेले. यावेळी राणेंच्या बांगल्याबाहेर समर्थकांनी कॉंग्रेस आणि नाना पटोले (nana patole) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच श्रीफळ वाढवून मालवणीत गाऱ्हाणे घातले. कॉंग्रेसला सद्बुद्धी देरे महाराजा असे म्हणत रामेश्वराला साकडं घातलं
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.