Shubhangi Patil
Shubhangi Patil saam tv
महाराष्ट्र

Nashik Graduate Constituency Election : थांबा, तुम्ही आत जाऊ नका ! शुभांगी पाटील यांना बाळासाहेब थोरातांच्या घराबाहेर अडवलं

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Nashik Graduate Constituency Election : महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर तालुक्यात निवडणुक (election) प्रचारार्थ दौरा करताहेत. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शुभांगी पाटील यांचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत केलं. शुभांगी पाटील (shubhangi patil) यांनी सय्यदबाबा दर्ग्यावर शाल अर्पण करत आपल्या दौ-याची सुरूवात केली.

शुभांगी पाटील या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरातील निवासस्थानी पोहचल्या. बाळासाहेब हे उपचारार्थ मुंबईतील रुग्णालयात आहेत. त्यामुळे पाटील यांना थाेरात यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशदारानजीक थांबवण्यात आले. त्यानंतर शुभांगी पाटील यांनी परतीचा मार्ग धरला.

माध्यमांशी बाेलताना पाटील म्हणाल्या थोरात यांच्याशी सकाळी फोनवर चर्चा झाली. ते हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे थोरात यांच्या निवासस्थानी कोणीही नव्हते. दरम्यान तरी देखील शुभांगी पाटील या थाेरातांच्या निवासस्थानी का गेल्या? त्यांची ही स्टंटबाजी हाेती की काय अशी शंका उपस्थित हाेत आहे. (Maharashtra Legislative Graduate Constituency Election Latest Updates)

थोरात साहेब भाच्याला नाही तर भाचीला आशीर्वाद देतील : शुभांगी पाटील

नेते मंडळींना भेटून आशीर्वाद घेणं हे माझ कर्तव्य आहे. मी महाविकास आघाडीची (mva) उमेदवार असल्याने बाळासाहेब थोरात भाच्याला नाही तर भाचीला म्हणजेच मला आशीर्वाद देतील असा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला. बाळासाहेब थोरात यांचे मत घेऊनच मोठ्या नेत्यांनी मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असणार. त्यामुळे मी काँग्रेस (congress), राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहील असेही त्यांनी नमूद केले.

जे पक्षाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार? सत्यजित तांबेंवर निशाणा

सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांचा एबी फॉर्म कोरा होता. ते आता कुठ जातील हा त्यांचा विषय आहे. जे पक्षाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होतील अशा शब्दात शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या मी तळागाळातील असून मला भाजपचा कुठलाही फटका बसणार नाही. मी हाडाची शिक्षिका आहे. कपिल पाटील यांनी वेगळा विचार केला असेल. कदाचित कपिल पाटील यांना इथली माहिती नसावी असा टोलाही शुभांगी पाटील यांनी लागवला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

SCROLL FOR NEXT