Trimbakeshwar News, Shravan Maas 2023: Saam tv
महाराष्ट्र

Shravan Mass 2023 : व्हीआयपी दर्शन सुविधा बंदनंतर भाविकांसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानचा आणखी एक माेठा निर्णय; ग्रामस्थांनाे! जाणून घ्या नियमावली

Trimbakeshwar Latest Marathi News : श्रावण मास निमित्त भाविक राज्यातील विविध महादेवाच्या मंदिरात गर्दी असते

अभिजीत सोनावणे

Trimbakeshwar Nashik News : 

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं श्रावण महिन्यांत भाविकांना दर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानने विशेष व्यवस्था केली आहे. नव्या निर्णायानूसार साेमवारी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना त्र्यंबकेश्वराचं दर्शन (Trimbakeshwar Darshan Timings) घेता येणार आहे. (Maharashtra News)

श्रावणात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी हाेत असते. भाविकांची माेठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानने व्हीआयपी दर्शन बंदचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे.

या निर्णयानंतर आता देवस्थानने त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रावणात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनसाठी विशेष व्यवस्था केली आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेता येणार आहे. तसेच गावकऱ्यांना मंदिर उघडल्यानंतर सकाळी 10:30 पर्यंत तर संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत दर्शन घेता येणार आहे.

- गावकऱ्यांना दर्शनाकरता येतांना रहिवासी पुरावा सोबत असणं बंधनकारक.

- गावकऱ्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश असणार.

- भाविकांना दर्शन रांगेत त्रास होऊ नये याकरिता वातानुकूलित दर्शन बारीची व्यवस्था केली आहे.

- जेष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था तर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT