bjp logo
bjp logo saam tv
महाराष्ट्र

काॅंग्रेसचा हात पकडणा-या 'त्या' बंडखोरांचे सदस्यत्व रद्द करा; BJP ची मागणी

अभिजीत घोरमारे

भंडारा : भाजप (bjp) पक्षाने जारी केलेला व्हीप झुगारुन भंडारा (bhandara) जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सोबत बंडखोरी करत काँग्रेससोबत (congress) सत्ता स्थापन करणाऱ्या त्या पाच बंडखोर सदस्यांविरोधात जिल्हाधिकारी संदीप कदम (collector sandip kadam) यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये मुळ भाजपकडून त्या बंडखोर सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यात जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष संदीप ताले, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री बंडू बनकर, दिलीप सार्वे, धुरपता मेहर, उमेश पाटील या बंडखाेर सदस्यांचा समावेश असून पक्षाच्या विरोधात जाऊन काँग्रेसला मदत केली. त्यामुळे या पाचही जणांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी भाजपने केली आहे. (bhandara latest marathi news)

दहा मे राेजी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत ५२ पैकी बहुमतासाठी २७ हा जादुई आकडा पार करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हते. अखेर राष्ट्रवादी (ncp) आपल्याकडे संख्याबळ नसल्याने त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. दरम्यान सवार्धिक २१ सदस्य निवडून आणलेल्या काॅंग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न सूरु असताना मात्र, भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील पाच जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षाचा व्हीप किंवा पक्षादेश न मानता काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करीत उपाध्यक्षपद मिळविले.

भाजपचा गट स्थापन झालेला असताना या पाच सदस्यांनी पक्षाच्या विरोधी भूमिका घेत बंडखोरी करून सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला मदत करणाऱ्या बंडखाेर माजी आमदार व त्यांच्या सर्व सदस्यांना चंद्रकांत पाटील यांनी निष्काषित केल्यानंतर भाजप तिकीटावर निवडून आणलेल्या या सर्व सदस्यांचे सभासदत्व रद्द करावे अशी याचिका भाजपच्या वतीने ॲड राहुल देवगड़े यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली आहे. तर दूसरी कड़े अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान सभागृहातच भाजपच्या दोन गटांमध्ये चांगलाच राडा झाल्याने या प्रकरणी महिला सदस्यांच्या तक्रारीवरून फुटिर गटातील उपाध्यक्ष यांच्यासह तिघांविरुद्ध विनयभंग व ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपाध्यक्ष संदीप ताले यांच्या तक्रारीवरून धक्काबुक्की आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडे याचिका दाखल केली असल्याने आता या याचिकेवर जिल्हाधिकारी लवकरच पाचही सदस्यांना नोटीस बजावतील असा दावा ऍड राहुल देवगड़े यांनी नमूद केले. दरम्यान त्यामुळे पाचही जणांचे सदस्यत्व रद्द होणार का? याकडे संपूर्ण जिल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Buldhana: ज्वारी खरेदीच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप, नोंदणी कार्यालयात तुडुंब गर्दी

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

Benifits of Pomogranate Peel: डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देताय का? जाणून घ्या आरोग्यादायी फायदे

Bhandara News: पिकविम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप

SCROLL FOR NEXT