Shocking : सर्पदंश झाल्याने सक्ख्या बहीण भावाचा मृत्यू! अरुण जोशी
महाराष्ट्र

Shocking : सर्पदंश झाल्याने सक्ख्या बहीण भावाचा मृत्यू!

शिक्षणानिमित्त मावस काकाच्या गावी राहत असलेल्या बहीण-भावाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अरुण जोशी

अमरावती : शिक्षणानिमित्त मावस काकाच्या गावी राहत असलेल्या बहीण-भावाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दर्यापुर तालुक्यातील थिलोरी येथील रहिवासी भीमराव चव्हाण यांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी, हि मुले राहत होती.

हे देखील पहा :

काल शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारात अचानक घरामध्ये साप निघाला. पवन बाळू चव्हाण वय १९ व स्वाती बाळू चव्हाण वय १३, या दोघांना या सापाने चावा घेतला. सर्पदंश झाल्याची माहिती घरातील लोकांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने दोघाही जणांना दर्यापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.

परंतु, त्या ठिकाणी दोघांचे उपचार न झाल्याने, त्यांना राशेगाव या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रस्त्याने जात असताना दोघाही बहीण-भावांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT