उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातानंतर आता एक एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूरचा उड्डाणाचा रेकॉर्ड वादग्रस्त असल्याचं समोर आलंय. कर्त्यव्यावर असताना मद्यपान केल्याचं उघड झाल्याने या पायलटवर यापूर्वी कारवाई झाली आहे.सुमित कपूरला 15 हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव होता. मात्र कारकिर्दीवर बेशीस्तीचा कलंक होता.
13 मार्च 2010 - दिल्ली-बेंगळुरू फ्लाइट (S2-231) दरम्यान अल्कोहोल पॉझिटिव्ह आढळले. त्यांना पहिला इशारा जारी केला.
7 एप्रिल 2017 - दिल्ली-गुवाहाटी फ्लाइट (S2-4721) दरम्यान पुन्हा अल्कोहोल पॉझिटिव्ह आढळले. सुरक्षा नियमांचं पुन्हा उल्लंघन
24 एप्रिल 2017 - वारंवार मद्यपान आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कठोर कारवाई. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डीजीसीएकडून 3 वर्षे निलंबनाची कारवाई
कोणत्याही व्यावसायिक वैमानिकासाठी तीन वर्षांचे निलंबन हे त्यांच्या कारकिर्दीच्या समाप्तीसारखे आहे. असे असूनही तो परतला आणि व्हीआयपी विमाने उडवू लागला. व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीत रुजू झाला. या दुर्घटनेनंतर ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनी आणि 'लिअरजेट' या विमानांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. व्हीएसआर व्हेंचर्सचे संचालक विजय कुमार सिंह यांनी विमाने १००% सुरक्षित असल्याचा दावा केलाय. मात्र सप्टेंबर २०२३ मध्ये या कंपनीच्या एका विमानाचा मुंबई विमानतळावर अपघात झाला होता.
दुसरीकडे ‘लिअरजेट ४५’ या प्रकारातील विमानाचे २००३ मध्ये इटली आणि मेक्सिकोमध्ये २००८ आणि २०२१ मध्ये अपघात झाले होते. गंभीर बाब म्हणजे कंपनीने असा कॅप्टन राज्याच्या उपमुख्यंमंत्र्याच्या सेवेसाठी कसा दिला..? सुमितची पार्श्वभूमी योग्यरित्या तपासली गेली नव्हती का? या दुर्घटनेला कंपनीचा निष्काळजीपणा भोवला का? या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राच्या जनतेला मिळायलाच हवीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.