दादांनंतर राष्ट्रवादीची पॉवर कुणाकडे? पवार आणि राष्ट्रवादी समीकरण कायम राहणार?

Who Will Control NCP After Ajit Pawar? अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण...मात्र आता दादांनंतर राष्ट्रवादीची कमान नेमकी कुणाकडे जाणार..? कोण करणार राष्ट्रवादीचं नेतृत्व ? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय मागणी केलीय ?
Political uncertainty grips NCP as leadership succession debate intensifies after Ajit Pawar
Political uncertainty grips NCP as leadership succession debate intensifies after Ajit PawarSaam Tv
Published On

याच कामाच्या झंझावाताच्या जोरावर अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित दादा...हे समीकरण तयार झालं....मात्र स्वतः राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीची पॉवर कुणाकडे जाणार? या चर्चांनी आता जोर धरलाय...नेमक्या काय शक्यता आहेत.

अजित पवारांच्या पत्नी असल्यानं राष्ट्रवादीची सुत्र थेट सुनेत्रा पवारांकडे येण्याची शक्यता आहे... त्यांच्याकडे अजितदादांसाठी पडद्यामागे काम करण्याचा मोठा अनुभव आहे तर सक्रीय राजकारणात दीड वर्षांचा अनुभव आहे..... त्यामुळे पक्ष संघटना एकसंध ठेवण्यात त्यांना यश मिळण्याची शक्यता अधिक आहे...

पार्थ पवार

अजित पवारांचा वारसदार असल्यानं राष्ट्रवादीची सुत्रं पार्थ पवारांकडे येण्याची शक्यता... मात्र संघटनात्मक बांधणी हा पार्थ पवारांचा कमजोर दुवा आहे... एवढंच नाही तर निवडणुका जिंकण्याचं गिमिक साध्य करता आलेल नाही

प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असल्यानं आणि शरद पवारांसोबत अनेक वर्षे कामाचा अनुभव असल्यानं संधी मिळण्याची शक्यता...मात्र संघटनात्मक पातळीवर आणि लोकनेते नसल्यानं कार्यकर्ते स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे

सुनील तटकरे

अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या तटकरेंनी महाराष्ट्रात संघटना बांधणीवर काम केलं आहे... तसंच जिल्हा स्तरीय केडरही त्यांच्यासोबत आहे..मात्र राष्ट्रीय स्तरावर तटकरेंना स्वीकारलं जाण्याची शक्यता कमी आहे..

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि पवारांसोबत प्रदीर्घ कामाचा अनुभव आहे.. तसंच भुजबळ ओबीसींचे बलाढ्य नेते आहेत.. त्यांचा संघटनात्मक आणि प्रशासकीय अनुभव पाहता त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.. मात्र भुजबळांना संधी दिल्यास मराठा समाज दुरावण्याची भीतीही आहे

राष्ट्रवादीचं एकत्रिकरण करुन सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांच्या हाती सुत्रं देण्याचीही शक्यता आहे..त्यामागचं कारण असं की, गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीतील कटुता कमी करुन एकत्रिकरणाच्या चाललेल्या हालचाली...... मात्र पुन्हा सुळे किंवा पवारांकडे सुत्रं गेल्यास अजित पवारांसह सत्तेच्या आश्रयाला गेलेले आमदार पवारांसोबत एकसंध न राहता भाजपसोबत जाण्याची शक्यता अधिक आहे...तर प्रादेशिक पक्षांचे सुप्रीम नेत्यांच्या मृत्यूनंतर भाजपनं संबंधित पक्षाचं भवितव्य ठरवण्याची भूमिका घेतली होती... ती कशी पाहूयात

जयललिता यांच्या मृत्यूनंतर अन्नाद्रमुकमध्ये ओ पनीरसेल्वन आणि पलानीस्वामींना एकत्र आणत शशिकलांना दूर ठेवण्यामागे भाजपचा हात

बिहारमध्ये रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर पशूपती पारस आणि चिराग पासवान यांच्यातील फुटीनंतर दोन्ही नेत्यांना सोबत घेत लोक जनशक्ती पक्षावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवलं

दुसरीकडे पक्षाची सुत्रं सुनेत्रा पवारांकडेच देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलीय

राष्ट्रवादीची सुत्रं देण्याबाबत राजकीय विश्लेषकांनीही कोणते आडाखे बांधले आहेत..विशेष म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे हंगामी अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे... मात्र त्यानंतर पवार कुटुंब राजकीयदृष्ट्याही एकत्र येऊन राजकारणात पॉवर ब्रँड बुलंद करणार की राष्ट्रवादीची सुत्रं निष्ठावंतांकडे दिली जाणार... याकडे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com