Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana : शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! पोषण आहार रद्दी पेपरवर वाटला, प्रशासन तरीही गप्प?

Buldhana ZP School News : बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी शाळेत विद्यार्थ्यांना स्टीलच्या प्लेटऐवजी रद्दी पेपरवर पोषण आहार देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय मुलांच्या अवतीभोवती श्वान मुक्तपणे फिरताना दिसल्याने मुलांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Alisha Khedekar

  • आदिवासी शाळेत मुलांना रद्दी पेपरवर पोषण आहार देण्याचा प्रकार उघडकीस

  • शाळेत श्वानांची मुक्त वावर दिसल्याने आरोग्याचा धोका

  • शासनाने दिलेल्या स्टील प्लेटचा वापर न केल्याचे स्पष्ट

  • शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

बुलढाण्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून शालेय पोषण आहार देण्यासाठी शासनाचे काही नियम आहेत. मात्र बुलढाणा जिल्हा परिषद शाळेत शासनाचे हे नियम धाब्यावर बसवत मुलांना शालेय पोषण आहार रद्दी पेपरवर देण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याशिवाय या मुलांच्या अवतीभवती श्वान फिरत असल्याचं देखील पाहायला मिळालं आहे.

आधीच जिल्हा परिषद शाळेची पट संख्या मोठ्या प्रमाणात घटत असताना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या आदिवासी भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसा खेळ केला जात आहे याचा धक्कादायक व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आला आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून शालेय पोषण आहार देण्यासाठी मोठी नियमावली शासनाने तयार केली आहे. मात्र नियमावली धाब्यावर बसवून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ शाळा प्रशासन करत आहे.

प्राथमिक शाळेतील मुलांना सकस पोषण आहार देताना मोठी काळजी घेण्याच्या सूचना असताना ही या मुलांना चक्क रद्दी पेपर वर खिचडी दिल्या जात आहे. तर मुलं पोषण आहार घेत असताना चक्क श्वान त्यांच्या भोवती फिरताना दिसत आहेत. खर तर या चिमुकल्यांना पोषण आहार देण्यासाठी प्रत्येक शाळेला शासनाने स्टीलच्या प्लेट उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र स्टीलच्या प्लेटमध्ये पोषण आहार न देता रद्दी पेपरवर पोषण आहार दिल्या जात असल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तर मुलं पोषण आहार खाताना त्यांच्या अवतीभवती श्र्वानांचा मुक्त संचारही दिसत आहे.

मुख्याध्यापक आणि कर्मचारी आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसं खेळतायेत हे या धक्कादायक घटनेतून समोर आलंय. याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत चार महिन्यांपूर्वी मी जिल्ह्यातील सर्व शाळांना कडक आदेश दिले होते अस ते म्हणाले. मात्र अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार दिल्या जात असेल तर आणि काही अनुचित प्रकार घडला तर जवाबदारी कुणाची? असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे. अतिशय धक्कादायक हा प्रकार असून शालेय शिक्षणमंत्री यावर कारवाई करतील का? यामुळे मात्र पालकांत संताप निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नांदेडमध्ये दुहेरी हत्याकांड! एकाच घरातील दोन सुनांची हत्या, नेमकं काय प्रकरण?

Gold Price Today : अचानक सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 22k आणि 24k चा आजचा दर

Maharashtra Politics: अर्ज माघारी घे नाही तर..., भाजप उमेदवाराकडून काँग्रेसच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Rava Kheer Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा झाली तर झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी रवा खीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT