नागपूर मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक
दुरंतो एक्स्प्रेसच्या एसी कोचच्या काचा फुटल्या
वर्ध्याजवळ धावत्या ट्रेनवर दगडफेक
दगडफेक करणाऱ्याचा रेल्वे पोलिसांकडून शोध सुरू
या दगडफेकीचा थरारक व्हिडीओ समोर आला
नागपूरहून मुंबईला येणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवारी रात्री वर्ध्याजवळ घडली. या घटनेमुळे ट्रेनचे मोठे नुकसान झाले. ट्रनेच्या एसी कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या काचांचे तुकडे प्रवाशांच्या जेवणात पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ट्रेनमधील प्रवासी प्रचंड घाबरले. ही दगडफेक कोणी आणि का केली याचा तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १२२९० दुरंतो एक्सप्रेस शुक्रवारी रात्री ८ वाजता नागपूरहून मुंबईसाठी निघाली. वर्धाजवळ पोहचताच अचानक कुणीतरी ट्रेनवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये बी-४ डब्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. प्रवासी जेवत असताना अचानक दगडफेक सुरू झाली ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काचांचे तुकडे प्रवाशांच्या जेवणात पडले.
या घटनेनंतर ट्रेन वर्धा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर ट्रेन मुंबईकडे रवाना झाली. दगडफेक कोणी केली याचा पोलिस तपास करत आहेत. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता घडली. वर्धाजवळ एका अज्ञात व्यक्तीने ट्रेनच्या एसी कोचवर दगडफेक केली. दगडफेकीनंतर ट्रेन वर्धा स्टेशनवर थांबवण्यात आली आणि रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेनंतर, रेल्वेच्या मेकॅनिकल टीमने काच दुरुस्त केल्यावर ट्रेन मुंबईकडे रवाना झाली.
मध्य रेल्वे स्टेशन जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी सांगितले की, दुरंतो एक्स्प्रेसने बोर्खेडी स्टेशन ओलांडल्यानंतर दगडफेक झाली. २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.२७ वाजता झालेल्या या दगडफेकीत A-1, B-2 आणि B-5 डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच RPF आणि GRP पथकाने बोर्खेडी-सिंधी दरम्यान शोधमोहीम राबवली. मात्र, संशयित व्यक्ती किंवा ठोस पुरावा हाती लागला नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात रेल्वे कायद्याच्या कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.