Crime News Saam TV
महाराष्ट्र

Shocking News : आर्थिक संकट, बेरोजगारी, कर्जबाजारीपणामुळे अनेकांना जीवन झालंय नकोसं; राज्यातील आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी समोर

Mumbai News : गेल्या वर्षभरात राज्यात सर्वाधिक म्हणजेच २२,७४६ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये १९,८३४ आत्महत्यांची नोंद झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News :

महाराष्ट्रातील नागरिकांच्या आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षभरातील देशातील आकडेवारी सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाला आहे. कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.

गेल्या वर्षभरात राज्यात सर्वाधिक म्हणजेच २२,७४६ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये १९,८३४ आत्महत्यांची नोंद झाली आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे १९४१ जणांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतर कर्नाटकात १,३३५ आणि आंध्र प्रदेशात ८१५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. एनसीआरबीच्या अहवालातून राज्यातील लाजिरवाणी आकडेवारी समोर आली आहे. (Latest News)

तर राज्यात बेरोजगारीमुळे ६४२, गरिबीमुळे ४०२ आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांमुळे ६४० नागरिकांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. राज्यात कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

गेल्या वर्षभरात कौटुंबिक कारणांमुळे जवळपास ६,९६१ आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये मिळून देशातील एकूण आत्महत्यांपैकी ४९.३ टक्के आत्महत्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT