Son Killed By Father, Jamner Crime Case Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Shocking! जळगाव हादरलं! बापानेच पोटच्या पोराला संपवलं, काका अन् भावाने केली मदत, पोलिसांनी बिंग फोडले

Jalgaon murder news, son killed by father : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कसबा पिंप्री येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुभम धनराज सुरळकर (वय २५) या युवकाचा खून त्याच्या वडिलांनीच केला असून, काका आणि भावानेही यात सहभाग घेतल्याचे उघड झाले आहे.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Son Killed By Father, Jamner Crime Case : जळगावमधील जामनेरमध्ये बापानेच पोटच्या पोराचा खून केल्याची हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. जामनेर तालुक्यातील कसबा पिंप्री गावातील २५ वर्षीय शुभम धनराज सुरळकर याची हत्या करण्यात आली. शुभमला त्याच्या जन्मदात्या पित्यानेच निघृणपणे संपवलं. काका आणि भावाने शुभमला संपवायला मदत केल्याचे समोर आलेय. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मयताचे वडील धनराज सुपडू सुरळकर, भाऊ गौरव सुरळकर आणि काका हरिलाल सुरळकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम याला दारूचे व्यसन होते. मद्याच्या नशेत तो किरकोळ कारणांवरून घरात सातत्याने भांडणे करायचा आणि कुटुंबीयांना मारहाण करायचा. त्याच्या या वर्तनाला कुटुंबीय कंटाळले होते. याच त्रासातून संतापलेल्या वडील धनराज यांनी शुभम झोपलेला असताना रागाच्या भरात त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकला. या हल्ल्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला.

खून केल्यानंतर धनराज यांनी आपला दुसरा मुलगा गौरव आणि भाऊ हरिलाल यांच्या मदतीने मृतदेह गावापासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला. ही घटना गावात पसरताच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि प्राथमिक चौकशीत धनराज यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात या तिघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सहभाग असल्याचे उघड झाले.

या घटनेने कसबा पिंप्री गावात शोककळा पसरली आहे. शुभमच्या कुटुंबीयांचे दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेले जीवन आणि त्यातून घडलेली ही दुदैवी घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिस पुढील तपास करत असून, आरोपींवर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: रोहित शर्माने घेतली ५ कोटींची आलिशान कार; नंबर प्लेट ३०१५ का?

Pune Accident: खेडमधील पिकअप अपघातातील ९ मृतांची नावं आली समोर, पापळवाडी गावावर शोककळा

Asia Cup 2025 India Squad: श्रेयस अय्यर पास; हार्दिक पांड्या वेटिंगवर तर सूर्या दादाबाबत सस्पेन्स

Janhvi Kapoor: परम सुंदरीचा नविन फ्लॉरल साडी लूक पाहिलात का?

बनावट शाळा आयडी प्रकरणात कारवाईचा धडाका; हजारो लाडक्या शिक्षक रडारवर|VIDEO

SCROLL FOR NEXT