Solapur News saam tv
महाराष्ट्र

Shocking: सकाळी-सकाळी गायीच्या गोठ्यात गेल्या सासू-सून मृतवस्थेत आढळल्या

Solapur Daughter-in-law And mother-in-law Death: विजेचा शॉक लागून दोन महिलांसह गायीचा मृ्त्यू झालाय. गोठ्यात विजेचा प्रवाह उतरला होता. माळशिरस तालुक्यातील महाळुंगे ही धक्कादायक घटना घडलीय.

Bharat Jadhav

  • माळशिरस तालुक्यातील महाळुंगे येथे विजेचा धक्का लागून दोन महिलांचा मृत्यू झाला.

  • रशिका रेडे आणि सुवर्णा रेडे यांचा गायींच्या गोठ्यात विजेचा प्रवाह उतरल्याने मृत्यू झाला.

  • पावसामुळे जमिनीत वीज उतरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

  • या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

भरत नागणे, साम प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. पावसामुळे गायींच्या गोठ्यात विजेचा प्रवाह उतरला होता. यात एका गाईसह सासू-सुनेचा मृत्यू झालाय. ही घटना माळशिरस तालुक्यातील महाळुंगे येथे घडली आहे. रशिका विठ्ठल रेडे (वय 57) आणि सुवर्णा अमोल रेडे (वय 27) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

आज सकाळी सहाच्या सुमारास रशिका रेडे गायीच्या गोठ्यात गेल्या होत्या. बसलेल्या गाईला उठवण्याचा त्या प्रयत्न करू लागल्या. त्यात त्यांनाही विजेचा शॉक लागला. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळात सुवर्णा रेडे या गोठ्यात गेल्या असता त्यांनागी विजेचा झटका बसला आणि त्यांचाही मृत्यू झाला.

रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोठ्याच्या पत्राशेडमध्ये पाणी साचले होते. त्यावेळी तिथे शॉर्टसर्किट झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. माळशिरस तालुक्यातील महाळुंगे येथील ढवळे वस्तीवर ही दुर्दैवी घटना घडली. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ट्रॅक्टरवरून पडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू

शेतात कीटकनाशक फवारणीसाठी जात असताना ट्रॅक्टरवरून पडून एका सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. ट्रॅकवरून खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर चाक गेले. यात त्याचा मृत्यू झाला. करण गजानन गोडघासे, असं मृत मुलाचं नाव आहे. तो अकरावीच्या वर्गात शिकत होता. करण कॉलेज सुटल्यावर शेतात मजुरीने काम करायचा. स्वभावाने अत्यंत नम्र असलेल्या करणच्या मृत्यू मुळं गावात हळहळ व्यक्त केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT