Solapur MIDC police arrest the accused in the shocking murder of a 3-year-old child Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Solapur : माणुसकीला काळिमा! कपड्याला शी लागली, आईच्या बॉयफ्रेंडने ३ वर्षांच्या मुलाचा गळा दाबला

Solapur mother boyfriend kills 3 year old child : सोलापूरमधील MIDC परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कपड्याला शी लागल्याच्या रागातून आईच्या कथित प्रियकराने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून खून केला.

Namdeo Kumbhar

विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी

Solapur Latest Crime news Marathi : सोलापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कपड्याला ३ वर्षांच्या मुलाची शी कपड्याला लागली, त्यामुळे मुलाच्या आईच्या कथित प्रियकरांने खून केला. या घटनेनंतर सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली. सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील कोंडानगर भागात ही खळबळजनक घटना घडली. मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला याला अटक करण्यात आली असून चौकशी करण्यात येत आहे.

अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला हा ३ वर्षाच्या फरहानसोबत झोपला होता. त्यावेळी त्या चिमुकल्याची 'शी' कपड्याला लागली. त्यामुळे रज्जाक याचा पारा चढला. त्याने संतापाच्या भरात फरहानला मारहाण केली अन् गळा दाबून जीव घेतला. पोस्टमार्टमच्या माध्यमातून ही धक्कादायक बाब समोर आली. कथित प्रियकर मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ३ वर्षाच्या चिमुकल्याची आई शैनाज जफर शेख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कथित प्रियकर मौलाली आणि शैनाज हे गेल्या काही महिन्यापासून सोलापुरात वास्तव्यास होते. ते मूळचे कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील आहेत. शैनाजला चार मुलं होती. शैनाज ही धुणेभांडी तर कथित प्रियकर मौलाली हा बिगारी कामगार म्हणून काम करत होता. मौलाली उर्फ अकबर हा 11 डिसेंबर रोजी दारू पिऊन येऊन घरी झोपला होता. त्याच्या शेजारी ३ वर्षाचा फरहान झोपला होता. झोपेत फरहानची शी आरोपीला लागली. आरोपीने ३ वर्षीय फरहानचा खून केला.

शैनाज घरी आल्यानंतर फरहान खाली पडल्याचं मौलाली उर्फ अकबर याने सांगितलं. फरहान एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळेस तेथील डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मात्र मौलाली उर्फ अकबर आणि शैनाज यांनी कर्नाटकातील विजयपूर येथे एसटी स्टँडवर गेल्यानंतर मौलाली उर्फ अकबर पळून गेला. त्यानंतर शैनाज हिने पहिल्या नवऱ्यासह शासकीय रुग्णालयात दाखल केले असता फरहानला मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणी विजयपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सोलापुरात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. त्यानंतर विजयपूर येथील शासकीय रुग्णालयाने सदरचा मृत्यू गळा दाबून झाल्याचा अहवाल देण्यात आला. आरोपीला सोलापूर MIDC POLICE यांनी अटक केली आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Back Blouse Design: ब्लाउजच्या गळ्यांचे बॅकलेस सुंदर डिझाइन, प्रत्येक लूकमध्ये दिसाल उठून

Maharashtra Live News Update: परभणीत पहिल्याच दिवशी महापालिकेत अर्जासाठी भावींच्या रांगा

Guhaghar : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी बाहेर फिरला जायचे आहे पण वेळ नाही , मग 'या' ठिकाणी प्लान करा वन डे पिकनिक

Dnyanada Ramtirthkar : अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अडकणार लग्न बंधनात, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Aries yearly horoscope: मेष राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार नवं वर्ष? कशी असेल आरोग्य आणि लव्ह लाईफ, पाहा

SCROLL FOR NEXT