सिंधुदुर्गातील कणकवलीत बस चालकावर महिलेनं हल्ला केला.
चालकानं महिलेला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवले होते.
संतप्त महिलेनं रस्त्यात सर्वांसमोर बस चालकाला चोप दिला.
हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांत अद्याप नोंद झालेली नाही.
सिंधुदुर्गातील कणवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खासगी बस चालकाला महिलेनं चांगलाच चोप दिला आहे. मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी महिलेनं बस चालकावर हल्ला केला आहे. ही संतापजनक घटना कणकवली शहरातील तिकीट बुकींग सेंटरजवळ घडली. बस चालकाला चोप देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
बस चालकानं महिलेच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवले होते. महिलांनी मोबाईल तपासले असता, त्यांनी बस चालकाला जाब विचारला. संतापलेल्या महिलांनी बस चालकावर हल्ला केला. तसेच चांगलाच चोप दिला. ही संतापजनक घटना कणकवली शहरातील तिकीट बुकींग सेंटरनजीक घडली. मात्र या प्रकाराची पोलीस स्थानकात कोणतीही नोंद झालेली नाही.
संबंधित महिला मुंबईला जाण्याची तयारी करीत होती. एका नामांकित कंपनीच्या ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करायची. दरम्यान मंगळवारी त्या बस स्टॉपवर पोहोचल्या. त्यांनी बस तिकीट काढली होती. कंपनीच्या बस चालकाने तिकीट बुकींगच्या आधारे महिलेचा मोबाईल नंबर घेतला. नंतर महिलेला त्या मोबाईल नंबरवर अश्लील व्हिडिओ पाठवला.
हा प्रकार त्याने दोन वेळा केला, अशी माहिती महिलेनं दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या या महिलेनं कणकवली शहरातील भर रस्त्यावरच सर्वांसमोर त्या चालकाला चांगलाच प्रसाद दिला. महिला बस चालकाला चोप देत असतानाच परिसरातील काहींनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. महिला बस चालकाला चोप देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.