Passenger Harassed Over Fare Dispute Saam TV News
महाराष्ट्र

सरकारी महिला कर्मचाऱ्यासोबत रिक्षा चालकाचे गैरकृत्य; नको तिथे स्पर्श अन् शिवीगाळ, पोलिसांनाही धमकावलं

Passenger Harassed Over Fare Dispute: रिक्षा चालकानं प्रवासी महिलेला शिवीगाळ करून वाईट हेतूने स्पर्श केला. मोबाईल हिसकावून घेतल्यावर परिसरात गोंधळ उडाला. वाहतूक पोलिसांना देखील धक्काबु्क्की व शिवीगाळ करण्यात आली.

Bhagyashree Kamble

  • रिक्षा चालकानं प्रवासी महिलेला शिवीगाळ करून वाईट हेतूने स्पर्श केला.

  • मोबाईल हिसकावून घेतल्यावर परिसरात गोंधळ उडाला.

  • वाहतूक पोलिसांना देखील धक्काबु्क्की व शिवीगाळ करण्यात आली.

  • नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षा चालकाने प्रवासी महिलेला शिवीगाळ करत वाईट हेतूने स्पर्श केला. तसेच पीडित महिलेचा मोबाईल हिसकावला. एवढ्यावरच न थांबता, त्याने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

युसूफ मोहंमद अली अन्सारी असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. पीडित महिला या राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागात कर्मचारी असून, त्या दररोज जालना येथून शहरात ये-जा करतात. सोमवारी घटनेच्या दिवशी त्या कार्यालयासमोरून रिक्षाने रेल्वे स्टेशन परिसरात उतरल्या. रोज १० रुपये प्रवासी भाडे होत असल्याने त्यांनी १० रुपये दिले.

मात्र त्याने महिलेला 'तू भिकारी आहेस का? अशा लोकांना मी रिक्षात बसवत नाही. मला २० रुपये दे' असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. पीडित महिला बोलत असताना रिक्षाचालक त्यांच्यावर धावून गेला. 'तू आता पश्चात्ताप करशील' असं म्हणत त्यानं महिलेला वाईट हेतूने स्पर्श केला. तसेच पीडित महिलेचा मोबाईल आणि फोन हिसकावला.

रिक्षा चालक आणि महिलेमध्ये झटापट सुरू असताना परिसरातील नागरिकांनी महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली. हे पाहून वाहतूक पोलिस अंमलदार गिरी आणि राठोड घटनास्थळी पोहोचले. वाहतूक पोलीस बोलत असताना रिक्षा चालकानं त्यांना धक्काबु्क्की केली. तसेच शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या हातात असलेले ई-चलान मशीन ओढून खाली फेकून दिली. नागरिकांच्या मदतीने रिक्षा चालकाला पकडण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT