तृतीयपंथी आणि पोलिसांमध्ये झटापटीनंतर हाणामारी; शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप

Clash Between Transgender Group and Police: तृतीयपंथी आणि पोलिसांमध्ये झटापट. निदर्शनादरम्यान पोलिसांच्या ११२ वाहनाची तोडफोड. तृतीयपंथीयांचा पोलिसांवर मारहाणीचा आणि गैरवर्तनाचा आरोप.
Clash Between Transgender Group and Police
Clash Between Transgender Group and PoliceSaam Tv News
Published On
Summary
  • गुरुग्राममध्ये तृतीयपंथी आणि पोलिसांमध्ये झटापट.

  • निदर्शनादरम्यान पोलिसांच्या ११२ वाहनाची तोडफोड.

  • तृतीयपंथीयांचा पोलिसांवर मारहाणीचा आणि गैरवर्तनाचा आरोप.

  • पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून आठ जणांना ताब्यात घेतलं.

सोमवारी सकाळी ट्रान्सजेंडर आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत गुरूग्राममध्ये मोठा गोंधळ उडाला. यादरम्यान, संतप्त तृतीयपंथीयांनी पोलिसांच्या ११२ वाहनाची तोडफोड केली. या झटापटीत काही तृतीयपंथीयांचे कपडे फाटले. ट्रान्सजेंडरच्या एका गटाने डीएलएफ फेज - २ पोलीस स्टेशनबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Clash Between Transgender Group and Police
वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

या आंदोलनाचे नेतृत्व शगुन नावाच्या एका तृतीयपंथीयाने केलं होतं. या ट्रान्सजेंडरनं पोलिसांवर मारहाण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शगुन आणि तिची मैत्रिणी सोनाली, शिवी आणि रिया एमजी रोड मेट्रो स्टेशनजवळ उभ्या होत्या. त्या ठिकाणी पोलीस आले. त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला. शगुनचा आरोप आहे की, पोलिसांनी त्यांच्यावर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आणला.

Clash Between Transgender Group and Police
इंडिया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा, मतचोरीविरूद्ध राहुल गांधींसह ३०० खासदारांचा एल्गार; मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार?

जेव्हा त्यांनी विरोध केला तेव्हा पोलिसांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये नेलं. रात्रीच्या वेळेस एकही महिला पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित नव्हते. सुमारे १२ पोलिसांनी ३ तृतियपंथियांना बेदम मारहाण केली, असा शगुनने आरोप केला आहे.

Clash Between Transgender Group and Police
'माजी उपराष्ट्रपतींना नजर कैदेत ठेवलंय, ते सुरक्षित नाहीत'; बड्या खासदाराचं अमित शहांना पत्र, राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, पोलिसांनी शगुनच्या आठ साथीदारांना विनाकारण पोलीस ठाण्यात बंद केले आणि त्यांना पाणी सुद्धा दिले नाही, असा आरोपही शगुननं केला. उपस्थित असलेल्या एका तृतीयपंथीयानं असाही दावा केला की, पोलिसांनी यापूर्वीही त्यांच्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले होते.

तृतीयपंथीयांनी केलेल्या आरोपानंतर पोलीस प्रवक्ते संदीप कुमार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. 'तृतीयपंथीयांनी केलेले आरोप सगळे निराधार आहेत. पोलीस पथक एमजी रोडवरून तृतीयपंथीयांना हटवत होते. कारण ते तिथे उभे होते. यादरम्यान, काही तृतीयपंथीयांनी पोलिसांवर हल्ला केला. तसेच लैंगिक संबंध ठेवण्यासाठी केलेली मागणी देखील पूर्णपणे खोटी आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, ८ तृतीयपंथीयांना ताब्यात घेतलं आहे', असं पोलीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com