Sangli Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: झोपेत असताना चाकूने सपासप वार, नवऱ्याने बायकोला जागीच संपवलं; सांगली हादरले

Sangli Crime: सांगलीमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली. झोपलेल्या बायकोवर नवऱ्याने धारधार शस्त्राने वार करत हत्या केली. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. सांगली शहरातील शांतीनगर येथे ही घटना घडली. नवऱ्या बायकोवर धारदार शस्त्राने वार करत तिला जागीच संपवलं. घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. कोमल प्रशांत एडके असं मृत विवाहितेचे नाव आहे. कोमल झोपेत असताना तिच्या नवऱ्याने तिच्यावर वार करत हत्या केली. बायकोची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून कोमल आणि तिचा नवरा यांच्यामध्ये वाद सुरू होते. अनेकदा हे वाद पोलिस ठाण्यापर्यंत देखील पोहोचले होते. पोलिसांनी समजूत काढत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा वाद काही मिटला नाही. कोमल तिच्या माहेरी मलकापूर या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास होती. शनिवारी प्रशांतने काजलची समजूत काढून तिला मलकापूरवरून घरी घेऊन आला होता.

सकाळच्या वेळेस कोमल झोपेत असतानाच त्याने धारदार शस्त्राने वार करीत तिची हत्या केली. कोमलची हत्या केल्यानंतर प्रशांतने घराला बाहेरून कडी लावत थेट सांगली शहर पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून काजलचा मृतदेह सांगली सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हत्येची बातमी वाऱ्यासारखी शांतीनगर परिसरामध्ये पसरली आणि बघायची एकच गर्दी झाली.

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये ५ वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. आईच्या डोळ्यासमोरच मुलाला संपवण्यात आले. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली. माथेफिरूने धारधार शस्त्राने वार करत चिमुकल्याचा जीव घेतला. या घटनेनंतर स्थांनिकांनी आरोपीला पकडून चांगला चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. गंभीर जखमी झालेल्या आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT