
Latest Marathi Crime News : अर्जेंटिनामधील ब्यूनस आयर्सच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने संतप्त जनसमुदाय उतरलाय. त्याला कारणही तसेच आहे. इन्स्टाग्राम लाईव्हवर तीन तरुणींची हत्या करम्यात आली. या हत्या करणाऱ्या आरोपीच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, यासाठी हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय रस्त्यावर उतरलाय.
लारा, ब्रेंडा, मोरेना या तरूणींच्या लाईव्ह हत्याने संपूर्ण अर्जेंटिना देश हादरला. हल्लेखोराने क्रूर पद्धतीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह ३ मुलींचा जीव घेतला. मुलींच्य कुटुंबियांसह हजारो लोक न्यायासाठी रस्त्यावर उथरले आहे. मिलालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ड्रग्ज पेडलर टोळीचा आहे. ड्रग्ज तस्करीच्या विरोधात अर्जेंटिनामधील प्रत्येक नागरिक आता आवाज उठवत आहे.
ड्रग्ज तस्कारांच्या या क्रूर हल्ल्याने अर्जेंटिनामधील प्रत्येक नागरिकाला धक्का बसलाय. त्यांच्या मनात संताप व्यक्त होत आहे. तिन्ही मुलींच्या कुटुंबियांनी आणि लोकांनी न्यायाची मागणी केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ड्रग्जचा नायनाट व्हावा, यासाठी रस्त्यावर संतप्त नागरिक उतरले आहेत. आमचं आयुष्य बेक्कार नाही, ही हत्या थांबवा.. अशा घोषणा दिल्या जात आहे. आंदोलनात ढोल वाजवत आपला निषेध लोक व्यक्त करत आहेत.
या घटनेचा आम्ही तपास करत आहोत. ड्रग्स तस्कारासोबत ही घटना जोडली जातेय. आरोपींनी इन्स्ट्रग्राम लाईव्ह करत ३ तरूणींची निर्घृण हत्या केली. ४५ जणांनी ही घटना लाईव्ह पाहिल्याचे समोर आलेय, असे अर्जेंटिनामधील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणात अर्जेंटिनामधील पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरूवात केली. तपासानंतर त्यांनी आतापर्यंत ५ जणांना बेड्या ठोकल्या आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.