Wardha Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: संतापजनक! कुत्र्यावर लैंगिक अत्याचार, वासनांध आजोबांनी सर्व मर्यादा ओलांडल्या

Wardha Crime: वर्ध्यामध्ये भयंकर घटना घडली. ६७ वर्षांच्या एका व्यक्तीने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले. या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिस त्याचा शोध घेत आहे. या घटनेमुले परिसरात खळबळ उडाली आहे.

Priya More

महाराष्ट्रातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ६७ वर्षांच्या व्यक्तीने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले. वर्धा जिल्ह्यातील मौजा धनोडी गावात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा धनोडी गावा राहणारी एक व्यक्ती हे भयंकर कृत्य केले. गावातील शाळेजवळ आरोपी कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत होता. गावातील नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ प्राणी तक्रार दाखल केली. प्राणीप्रेमींनी या आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्राणीप्रेमीच्या तक्रारीवरून, मंगळवारी आर्वी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे असे पोलिसांनी सांगितले.

समाजात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोपीला तात्काळ अटक करून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी केली. याआधी नागपूरमध्ये गायीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devgad Tourism : समुद्रकिनारा अन् ऐतिहासिक किल्ला; देवगडला गेल्यावर 'हे' ठिकाण नक्की पाहा

Liver Damage Symptoms: सतत अपचन, जुलाब, पोट दुखतंय? असू शकतात लिव्हर डॅमेजची लक्षणे

Maharashtra Live News Update : : पुण्याच्या दौंड शहरात दुहेरी दरोडा; मध्यरात्री दोन ठिकाणी दरोडेखोरांचा धुमाकूळ

Viral Video News : हायवेवर स्टंट करताना भयंकर अपघात, शेवटची ३७ सेकंद काळजाचा ठोका चुकवणारी, VIDEO

Aloo Matar Recipe : हॉटेलमध्ये बनवतात तशी 'मटार बटाटा भाजी', रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटेल

SCROLL FOR NEXT