Beed Crime News Saam tv news
महाराष्ट्र

Beed: 'तुमचा मुलगा कुठेय?' ३० ते ४० जणांच्या टोळक्यानं बीडच्या कुटुंबाला धमकावलं; दगड अन् चाकूने प्राणघातक हल्ला

Shocking Beed Crime News: बीडमध्ये किरकोळ वादातून एका कुटुंबावर ३०-४० जणांच्या टोळक्याने हल्ला केला. दोन जण जखमी झाले असून, अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. पीडितांनी न्यायाची मागणी केली आहे.

Bhagyashree Kamble

बीड जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीड शहरात पुन्हा एक गंभीर हल्ल्याची घटना समोर आली आहे. तब्बल ३० ते ४० जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावर दगड आणि चाकूचा धाक दाखवत हल्ला केला. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिनकर आडागळे आणि रेणुका आडागळे अशी जखमी व्यक्तींची नाव आहेत. आडागळे कुटुंब बीड शहरातील शाहुनगर भागातील गजानन कॉलनीतील रहिवासी आहेत. घटनेच्या दिवशी आडागळे कुटुंबाच्या घरात ३० ते ४० जण घुसले. तसेच दिनकर आडागळे आणि रेणुका आडागळे यांच्या मुलाचा शोध घेतला. 'तुमचा मुलगा कुठे लपला आहे?' असा जाब विचारत चाकूचा धाक दाखवला. आडागळे तरूणासोबत झालेल्या वादातून टोळके तरूणाचा शोध घेत होते.

यावेळी टोळक्याने चाकूचा धाक दाखवत तरूणाच्या आई वडिलांना बेदम मारहाण केली. तसेच घरातील किमती वस्तूंचीही तोडफोड केली. या गंभीर हल्ल्यात दिनकर आडागळे आणि रेणुका आडागळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अद्यापपर्यंत आरोपींनवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या घटनेनंतर 'आम्हाला न्याय द्यावा, आमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे', असं म्हणत आडागळे कुटुंबाने पोलिसांकडे मदत मागितली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी, तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : दबक्या पावलांनी आला पण, शिकारी हातातून सटकला; बिबट्याच्या शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद

High Heel Side Effects: सतत हिल सॅन्डल्स घातलताय, होऊ शकतात या समस्या

Kala Vatana Usal: पावसाळ्यात बनवा झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ, चव वाढवण्यासाठी वापरा 'ही' खास ट्रिक

Maharashtra Live News Update: सलग चौथ्या दिवशी उधाणाचा कोकण किनारपट्टीला फटका

BMC निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी कसली कंबर, ८ शिलेदार निवडले, कोणकोणत्या नेत्याला संधी?

SCROLL FOR NEXT