corona virus Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक : लातुरात 51 नागरिक परदेशातून दाखल; एक व्यक्ती पॉझिटिव्ह!

लातुर जिल्ह्यामध्ये आजतागायत 51 नागरिक परदेशातून आलेले आहेत. त्यामध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या अति जोखमीच्या देशातून चार नागरिक आलेले आहेत.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या (Corona) नव्या ओमायक्रोन व्हेरियंटचा (omicron variant) धुमाकूळ सुरू असतानाच लातुरात एकही ओमीक्रॉनचा रुग्ण अद्यापही सापडलेला नाही. मात्र, आता धक्कादायक बातमी हाती आली आहे. लातुर (latur) जिल्ह्यामध्ये आजतागायत 51 नागरिक परदेशातून आलेले आहेत. त्यामध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या अति जोखमीच्या देशातून चार नागरिक आलेले आहेत.

हे देखील पहा :

तर, उर्वरित 47 नागरिक कमी जोखमीच्या देशातून आलेले आहेत. त्यापैकी 44 लोकांची RTPCR तपासणी करण्यात आली. आजतागायत सोळा व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातील एक जण व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला आहे. पण, हा पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती व ओमायक्रोन व्हेरिएंटचा आहे की अन्य व्हेरिएंटचा आहे. याबद्दल आरोग्य प्रशासनच साशंक आहे. या पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे जीनोम सिक्वेन्ससिंग करण्यासाठी त्याचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रामध्ये पाठवण्यात आले असून याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

आता सध्याला पॉझिटिव्ह रुग्ण नेमका डेल्टा व्हेरिएंटचा आहे की, ओमीक्रॉन व्हेरिएंटचा हे जीनोम सिक्वेन्स सिंगच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. तथापि नागरिकांनी घाबरून न जाता अश्या विषाणूवर लस हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: काळेभोर आणि दाट केसांसाठी एकदा ट्राय करा 'हे' उपाय

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

SCROLL FOR NEXT